टीम इंडियाची (Team india) श्रीलंकाविरुद्ध एक महत्त्वाची कसोटी मालिका 15 (Test Series between india vs Srilanka) ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना गाले येथे खेळवला जाणार असून, त्यापूर्वी शुबमन गिल आणि संघाला एक सराव सामना (वार्म-अप मॅच) खेळायचा आहे.
मात्र, आता सराव सामन्याच्या वेळापत्रकात बदल झाल्याची बातमी समोर येत आहे.
श्रीलंका दौऱ्यावर भारताला 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची असून, जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) गुणतक्त्याच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. गाले कसोटीपूर्वी भारत आणि श्रीलंका दोन्ही संघात (Sri Lanka XI) यांच्यात एक सराव सामना होणार आहे.
रिपोर्टनुसार, हा सामना आधी 4 दिवसांचा होता, जो आता कमी करून 3 दिवसांचा करण्यात आला आहे. हा सराव सामना 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाईल. संघ जाहीर करताना बीसीसीआयनेही (BCCI) 7 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये 4 दिवसांच्या सराव सामन्याची माहिती दिली होती.
बीसीसीआय आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळापत्रकातील या बदलाची माहिती देण्यात आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील हा सराव सामना कोलंबोच्या एनसीसी (NCC) मैदानावर खेळवला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, वेळापत्रकात बदल करण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाशी संबंधित सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. या सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) देखील केले जाईल. भारतीय संघ 4 जून रोजी कोलंबोसाठी रवाना होणार आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill under captaincy) नेतृत्वाखालील या संघात रविंद्र जडेजाचे (Ravindra Jadeja & Jasprit Bumrah) पुनरागमन झाले असून जसप्रीत बुमराहचाही संघात समावेश आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू सारांश जैन याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसरा कसोटी सामना सिंहलीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट मैदानावर होईल. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होतील.

