Thursday, 25 Feb, 12.20 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
जब मिलेंगे तीन यार.! माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने शेअर केला खास फोटो

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असा मान मिळवलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (पूर्वाश्रमीचे सरदार पटेल स्टेडियम) भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तिसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. यजमान भारताने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवत पाहुण्या इंग्लंड संघाला नामोहरम केले. याच वेळी, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग याने ट्विट करत भारतीय संघातील आपल्या काही जुन्या सहकार्‍यांसोबतचे सामन्याचा आनंद लुटतानाचे एक छायाचित्र शेअर केले.

आरपी सिंगने शेअर केले छायाचित्र

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज व सध्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य असलेला आरपी सिंग हा भारत व इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होता. उद्घाटनानंतर तो भारतीय संघातील आपले जुने सहकारी फिरकीपटू प्रग्यान ओझा व यष्टिरक्षक पार्थिव पटेल यांच्यासमवेत सामन्याचा आनंद लुटताना दिसून आला. आरपीने आपल्या ट्विटरवर ट्विट करताना लिहिले की, 'हे खूप मजेशीर क्षण आहेत. जुने मित्र पार्थिव पटेल व प्रज्ञान ओझा यांच्यासोबत गुलाबी चेंडूने खेळला जाणारा या सामन्याचा आस्वाद मी घेत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर अल्हाददायक वातावरण आहे.'

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा हा सध्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचा सदस्य आहे. तर, पार्थिव पटेल यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

भारतीय संघाने गाजवला पहिला दिवस
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्याला अहमदाबाद येथे सुरुवात झाली. इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, अक्षर पटेलने ६ व रविचंद्रन अश्विनने तीन गडी बाद करत त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. त्यानंतर, फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवसाखेर तीन बाद ९९ अशी मजल मारली होती.

महत्वाच्या बातम्या:

व्हिडिओ : विवादित झेलामुळे स्टोक्स होतोय ट्रोल, चाहत्यांनी केली पॉंटिंगशी तुलना

INDvsENG 3rd Test Live: रोहित शर्माचे दमदार नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसाखेर भारताच्या ३ बाद ९९ धावा

ईशांत शर्माने उलगडली धोनीसह खेळलेल्या त्या सामन्याची आठवण, भावूक होत म्हणाला

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top