Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जड्डू-वैभवमुळे आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले 'असे'! वाचा सविस्तर

जड्डू-वैभवमुळे आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले 'असे'! वाचा सविस्तर

यपीएल 2026 मध्ये दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला, ज्यामध्ये जीटीने बाजी मारली असली तरी एक अनोखा विक्रम मात्र आरआरच्या खेळाडूंच्या नावावर झाला आहे.

मुल्लाणपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि रवींद्र जडेजा यांच्यामुळे आयपीएलच्या इतिहासात एका विशेष विक्रमाची नोंद झाली आहे.

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन खेळाडूंनी एकाच सामन्यात दोनदा अर्धशतकी भागीदारी केली आहे. ही कामगिरी आरआरचे फलंदाज वैभव आणि जडेजा यांनी केली आहे. या दोघांनी प्रथम क्वालिफायर 2 सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि त्यानंतर सहाव्या विकेटसाठी 50 पेक्षा अधिक धावा जोडल्या. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन खेळाडूंनी एकाच सामन्यात दोनदा भागीदारी केली आहे.

या सामन्यात आरआरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या दोन विकेट्स लवकरच गमावल्या. त्यामुळे जडेजा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने वैभवला चांगली साथ दिली आणि दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 73 धावांची भागीदारी केली. काही वेळानंतर जडेजा दुखापतग्रस्त झाला आणि त्याला निवृत्त होत मैदान सोडावे लागले. नंतर तो फलंदाजीसाठी परतला आणि तोपर्यंत आरआरच्या आणखी तीन विकेट्स पडल्या होत्या.

परतल्यानंतर जडेजाने पुन्हा वैभवची साथ दिली आणि दोघांनी सहाव्या विकेटसाठी आणखी एक अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 28 चेंडूंत 54 धावा जोडल्या. यामुळे या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच डावात दोन वेगवेगळ्या विकेट्ससाठी दोन फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. हा विक्रम आता एकदा अर्धशथकी आणि एकदा शतकी, तिंवा दोन्ही वेळा शतकी भागीदारी झाल्यावर किंवा दोन फलंदाजांनी एकत्र येऊन तीनदा अर्धशतकी भागीदारी केल्यावरच मोडला जाऊ शकतो.

हा सामना आरआरने 7 विकेट्सने गमावला, मात्र वैभव-जडेजाने हा अनोखा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात आरआरने 20 षटकांत 6 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात जीटीकडून कर्णधार शुबमन गिलने शतकी खेळी केली आणि 2022 च्या विजेत्या संघाने 18.4 षटकांत लक्ष्य गाठले. आता त्यांची अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी टक्कर होणार आहे. हा सामना 31 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports