Monday, 28 Sep, 7.52 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
जेसन होल्डर ४ वर्षांनी उतरणार आयपीएलच्या मैदानात, जाणून घ्या त्याच्याबद्दल ३ खास गोष्टी

आयपीएल २०२० च्या सुरुवातीलाच सनरायझर्स हैदराबाद संघाला मिशेल मार्शच्या दुखापतीचा फटका बसला. मार्शला त्याच्या दुखापतीमुळे या आयपीएल हंगामातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने जखमी मिशेल मार्शच्या जागी वेस्टइंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला संघात स्थान दिले आहे.

आयपीएल २०२० मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स संघाची मधली फळी पूर्णपणे फ्लॉप झाली आणि यामुळे सनरायझर्स संघ १० धावांनी पराभूत झाला. सनरायझर्स हैदराबादकडून सर्व प्रथम, त्यांचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर धावबाद झाला. यानंतर, रशीद खान आणि अभिषेक शर्मा धावा घेताना एकमेकांशी भिडले, यामुळे राशिद खानला दुखापत झाली. दुसरीकडे अनुभवी अष्टपैलू मिशेल मार्श गोलंदाजी करताना जखमी झाल्याने संघाला मोठा धक्का बसला. तरीपण फलंदाजीच्या वेळी त्याला पुन्हा मैदानात पाठवले गेले होते, परंतु दुखापतीमुळे त्याला एकही धावा करता आला नाही.

आता तो दुखापतीमुळे बाहेर गेल्याने त्याच्या ऐवजी सनरायझर्स हैदराबाद संघात संधी मिळालेला जेसन होल्डरला एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मानले जाते. जेसन होल्डरहा जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये येतो. त्याच्या आगमनाने हैदराबाद संघाला एक अष्टपैलू खेळाडू मिळाला आणि त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला नक्की मिळेल.

या लेखात जेसन होल्डर बद्दल ३ गोष्टी सांगत आहोत ज्या आपल्याला कदाचित माहित नसतील.

टी-२० आंतरराष्ट्रीय खेळण्यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले

२०१३ च्या आयपीएल हंगामात जेसन होल्डरने पदार्पण केले होते. त्याला आयपीएलमध्ये सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या संघात स्थान दिले. त्याआधी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही टी-२० सामना खेळला नव्हता किंवा कसोटी सामना खेळला नव्हता. त्याला २०१३ च्या आयपीएल स्पर्धेत फक्त ६ सामने खेळायला मिळालेले. त्यात त्याने फक्त २ बळी मिळवले.

जेसन होल्डरने विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिज संघाचे दोन वेळा नेतृत्व केले आहे

जेसन होल्डरने २ विश्वचषकामध्ये वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले आहे. २०१५ च्या ऑस्ट्रेलियामधील विश्वचषकात त्याने आपल्या संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेले. यानंतर, २०१९ च्या विश्वचषकामध्येही तो वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार होता. परंतु, या विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाने चांगली कामगिरी केली नाही.

त्याने आतापर्यंत ४३ वनडे सामने खेळले आहेत तर ११५ कसोटी सामने खेळले आहेत, तसेच १७ टी-२० सामनेही तो खेळला आहे.

जेसन होल्डर आयपीएलमध्ये ४ वर्षानंतर परतला

४ वर्षानंतर जेसन होल्डर आयपीएलमध्ये परतला आहे. २०१३ च्या हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण केले आणि २०१६ पर्यंत तो आयपीएलचा भाग होता. २०१३ ते २०१६ च्या दरम्यान तो ३ संघातून खेळला.

सीएसकेने सोडल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला संघात घेतले. त्यानंतर तो २०१६ च्या आयपीएल हंगामात केकेआरच्या टीमचा भाग होता. परंतु, त्याला त्या मोसमानंतर इतर कोणत्याही संघाने विकत घेतले नाही आणि आता ४ वर्षानंतर आयपीएलमध्ये बदली खेळाडू म्हणून परत आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top