Thursday, 22 Jul, 5.36 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
जो धोनी, गांगुलीलाही जमला नाही तो विक्रम करण्याची शिखर धवनला आहे सुवर्णसंधी

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर युवा खेळाडूंचा संघ रवाना करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. कर्णधार म्हणून पहिलीच वनडे मालिका खेळत असलेल्या शिखर धवनला तिसरा वनडे सामना जिंकून मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी पहिल्या २ सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत श्रीलंका संघावर २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. तसेच मालिकेतील तिसरा सामन्यात विजय मिळवताच शिखर धवनकडे कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच वनडे मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप करण्याची सुवर्णसंधी आहे.

यापूर्वी दिग्गज कर्णधार एमएस धोनी,सौरव गांगुली आणि विराट यांना देखील असा कारनामा करता आला नाही.धोनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध २-४ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. (If shikhar dhawan won third odi will create new record)

धावा करण्याच्या बाबतीत धवन सर्वोच्च स्थानी
सध्या सुरू असलेल्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन सर्वोच्च स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ११५ धावा करण्यात यश आले आहे. या दरम्यान त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला आहे. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने ८४, दीपक चाहरने ६९ आणि आणि मनीष पांडेने ६३ धावा केल्या आहेत.

भारीच! स्टार्कने टाकलेल्या चेंडूने बेल्स तर उडवलेच, पण स्टंपलाही उडवले दूरवर, फलंदाजही शॉक, पाहा व्हिडिओ

गिल, आवेश पाठोपाठ भारताचा अष्टपैलू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, सराव सामन्यात झाली दुखापत

'ड्रायव्हर म्हणून कसा आहे विराट?' गेलने दिले 'हे' उत्तर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top