Thursday, 14 Oct, 12.36 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
ज्याची भीती होती तेच झाले; दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्याच ९ वर्षांपूर्वीच्या नकोशा कामगिरीची केली पुनरावृत्ती

आयपीएल २०२१ स्पर्धेत सोमवारी (१३ ऑक्टोबर) क्वालिफायर २ चा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ९ वर्षांपूर्वीच्या नकोशा कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. हा संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी होता. त्यांची ही कामगिरी पाहता, त्यांना या स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु क्वालिफायर १ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला धूळ चारली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. पुढे दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळाली. परंतु ही संधी देखील दिल्ली कॅपिटल्स संघाने गमावली. कोलकाता नाईट रायडर्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्स संघाचे आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्न तोडले.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पराभूत होताच दिल्ली कॅपिटल्स संघाने ९ वर्षांपूर्वी झालेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ २०१२ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत देखील गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाला क्वालिफायर १ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर हा संघ क्वालिफायर २ मध्ये दाखल होता. जिथे चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला ८६ धावांनी पराभूत केले होते.

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने आतापर्यंत एकूण ६ वेळेस प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांना एक वेळेस अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यश आले आहे. २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु या सामन्यात देखील त्यांना मुंबई इंडियन्स संघाने पराभूत करत त्यांचे जेतेपदाचे स्वप्न तोडले होते.

हताश..निराश..नाराज! रबाडाने दांडी गुल करताच चिडला दिनेश कार्तिक, हाताने उडवला स्टंप

त्रागा भोवला; फायनलपूर्वी दिनेश कार्तिकला बीसीसीआयची फटकार, 'ते' कृत्य केल्याने झाली शिक्षा

चेन्नईसाठी विजेतेपदाचं स्वप्न तितके सोपेही नाही! कोलकाताचा 'हा' रेकाॅर्ड तोंडात बोटे घालायला लावणारा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top