Wednesday, 15 Sep, 7.52 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
केकेआर विरुद्ध आरसीबी खेळणार निळ्या जर्सीत, कारण ऐकून कराल कौतुक

आयपीएलच्या २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून केले गेले आहे. तत्पूर्वी भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आयपीएल संघांतील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम मे महिन्यात अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आली होता. त्यानंतर हा उर्वरित हंगाम युएईमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता याच पार्श्वभूमीवर आयपीएल फ्रेंचायझी राॅयल चॅलेंजर्स बेगलोरने एक निर्णय घेतला आहे. आरसीबी संघाच्या जर्सीचा रंग लाल असून संघ दरवर्षी काही सामने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळत असतो. मात्र, यावर्षी संघ आयपीएलच्या एका सामन्यात निळ्या रंगाजी जर्सी घालणार आहे.

आरसीबीने संघाने मागच्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात लोकांची अविरत सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात लोकांची सेवा करताना या कर्मचाऱ्यांना नेहमी तोंडावर मास्क आणि पीपीई किट घालावे लागते आणि त्याचा रंग निळा असल्यामुळे आरसीबी संघाने एका सामन्यात निळी जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त आरसीबी संघ त्यांच्यासाठी आर्थिक मदतही करणार आहे.

आरसीबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संघातील काही खेळाडूंचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात त्यांनी या निळ्या जर्सीमागचे कारण स्पष्ट केले आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला कर्णधार विराट कोहली याबाबत माहिती देत आहे. तो म्हणतो. "आमची फ्रेंचायझी मागच्या एका आठवड्यापासून याच्यावर चर्चा करत होती की, आम्ही आपल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी सन्मानासाठी काय करू शकतो आणि त्यांची मदत कशी करू शकतो. आरसीबीने आरोग्य क्षेत्रात काही गोष्टी अशा पाहिल्या, जेथे तत्काळ मदतीची गरज आहे, जसे की ऑक्सीजन सपोर्ट आणि आम्ही यासाठी आर्थिक मदत करणार आहोत."

तो पुढे म्हणाला, "आम्ही दर वर्षी पहिल्यांदा जो ग्रीन सामना खेळातो, पण यावर्षी निळी जर्सी घालून खेळू. हा एक संदेश आहे की आपण आपल्या फ्रंटलाइन वर्कर्ससोबत मजबूतीने उभे आहोत." यानंतर डिव्हिलियर्स, नवदीप सैनी, सचिन बेबी, देवदत्त पडिक्कर आणि इतरही खेळाडू संघाच्या या निर्णयाचे महत्व स्पष्ट करतात.

आरसीबी आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात २० सप्टेंबरला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आभियानाला सुरुवात करणार आहे. याच सामन्यात ते निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरतील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top