Sunday, 24 Jan, 10.36 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
"खचू नकोस, तुझीही वेळ येईल", ऑसींविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर रहाणेने कुलदीपला दिला धीर

ब्रिस्बेनच्या द गॅबा मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला ३ विकेट्सने धूळ चारली. यासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळविला. यासह भारताने तिसऱ्यांदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सर्व खेळाडूंचे आभार मानले. सोबतच त्याने त्या खेळाडूचीही हिम्मत वाढवली, ज्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. हा खेळाडू म्हणजे, 'कुलदीप यादव'.

रहाणेचा कुलदीपला विशेष संदेश

रहाणेने ब्रिस्बेन कसोटीत विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये भावनिक भाषण केले. यावेळी भारतीय संघाचा चायनामन कुलदीपला खचू नकोस असा सल्ला देताना सर्व सहकाऱ्यांसमोर कौतुक करून त्याचे मनोबल उंचावले. "हा आपल्या सर्वांसाठी खूप मोठा क्षण आहे. या विजयात सर्वांनी बरोबरीचा वाटा उचलला आहे. यावेळी मी खासकरून कुलदीप यादव आणि कार्तिक त्यागी यांचे आभार व्यक्त करतो", असे रहाणे म्हणाला.

"कुलदीप मला माहिती आहे, हा दौरा तुझ्यासाठी खूप खडतर राहिला आहे. कारण यावेळी तुला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु तू संघाबाहेर राहून दिलेले योगदानही तेवढेच महत्त्वाचे आहे. खचू नकोस, तू फक्त अशीच मेहनत करत राहा. तुझीही वेळ नक्कीच येईल", असे पुढे बोलताना रहाणे म्हणाला.

कुलदीपला मिळून शकते अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यावेळच्या भारतीय कसोटी संघात कुलदीपची निवड करण्यात आली आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारतीय कसोटी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी यासंदर्भात संकेत दिले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेने केले होते भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल

द्रविडचा 'तो' इमेल शेअर करत पीटरसनची भारत दौऱ्याआधी इंग्लंडच्या सलामीवीरांना मदत

IND Vs AUS: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 'या' दिवशी टीम इंडिया होणार चेन्नईला रवाना

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top