Wednesday, 05 May, 8.44 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
'खत्म, टाटा, बाय-बाय'; आयपीएल २०२१चा हंगाम स्थगित झाल्याने RRच्या खेळाडूची हटके प्रतिक्रिया

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला. बायो बबलचे काटेकोरपने पालन केले असताना देखील आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा स्थगित केल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान पराग याने मजेशीर ट्विट करत आयपीएल २०२१ स्पर्धेतून निरोप घेतला आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. मंगळवारी (४ मे) आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांतील कोरोना बाधेचे वाढते प्रमाण पाहता आयपीएल कमिटीने तातडीची बैठक घेऊन आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित निर्णय घेतला. हा निर्णय येताच राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान पराग याने काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या स्टाइलमध्ये ट्विट करत, "संपलं, टाटा, बाय बाय" असे ट्विट केले होते. हे ट्विट भरपूर शेअर केले जात आहे.

युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने दमदार कामगिरी केली होती. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले होते. यात त्यांना ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत ६ गुणांसह पाचव्या स्थानावर होता.

तसेच रियान परागने या आयपीएल हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्याला अवघ्या ७८ धावा करण्यात यश आले होते. तसेच त्याने १ गडी देखील बाद केला होता. त्याने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २६ सामने खेळले आहेत. यात त्याला ३२४ धावा करण्यात यश आले आहे. यात ५० धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

या खेळाडूंनी घेतली होती आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार
भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ऑस्ट्रेलियन संघातील तीन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. यामध्ये केन रिचर्डसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), ॲडम झंपा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) आणि अँड्र्यू टाय (राजस्थान रॉयल्स) यांचा समावेश होता. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने देखील आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे माघार घेतली होती.

हीच का तुमची संवेदनशीलता? आयपीएल संघाच्या बससाठी पोलिसांनी ऍम्ब्युलन्सला थांबवले, व्हिडिओ व्हायरल

आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतताना संघर्ष करावा लागणाऱ्या परदेशी खेळाडूंची संपूर्ण यादी

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला मृत्यूचा उल्लेख, अश्विनने दिली 'अशी' प्रतिक्रिया

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top