Saturday, 14 Dec, 3.15 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जितेश शिरवाडकर यांची स्पर्धा मॅनेजर म्हणून नियुक्ती.

पहिल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० साठी ऐकेएफआय कडून खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये कबड्डी खेळ समाविष्ट करण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाने कबड्डी खेळ युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये समाविष्ट केला.

सदर स्पर्धा भुवनेश्वर- ओडिशा येथे दिनांक २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२० दरम्यान पार पडणार आहे. स्पर्धेतील कबड्डी खेळाच्या मॅनेजर साठी ऐकेएफआयने अर्ज मागवले होते. त्यासाठी २६ अर्ज आले होते. त्यामधून अनुभव, पात्रता, प्राविण्य, कबड्डी खेळाविषयी माहिती व वय सर्व गोष्टींचा विचार करून सदर स्पर्धेसाठी जितेश दत्ता शिरोडकर यांची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी कबड्डी स्पर्धा मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जितेश शिरवाडकर हे आंतराष्ट्रीय कबड्डी पंच असून प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामापासून ते प्रो कबड्डीत पंच म्हणून काम करत आहेत. मुंबई शहर व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमध्ये ही ते पंच म्हणून नावाजलेले आहेत.

स्पर्धा मॅनेजर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जितेश शिरवाडकराशी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. "आतापर्यत मी खूप चांगल्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. प्रो कबड्डी, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून अनुभव आहे. पण पहिल्यांदाच स्पर्धा मॅनेजर म्हणून संधी मिळाली आहे. माझ्या करियर मधील ही सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top