Thursday, 17 Oct, 8.12 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
कोहलीच्या आरसीबी संघात झाला या महिलेचा समावेश, आयपीएलमध्ये घडला इतिहास

2020 ला होणाऱ्या इंडियन प्रीमीयर लीगच्या(आयपीएल) 13 व्या मोसमासाठी सपोर्ट स्टाफमध्ये एका महिलेचा समावेश करणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पहिला संघ ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नवनीता गौतम यांची संघाच्या मसाज थेरपिस्ट म्हणून नियुक्ती केली आहे.

त्यामुळे आता आयपीएलच्या 13 व्या मोसमात नवनीता फिजीओथेरपिस्ट इव्हान स्पीचली आणि स्ट्रेंथ अँड कंन्डिशनिंग प्रशिक्षक शंकर बासू यांच्याबरोबर काम करताना दिसणार आहे. त्या संघासाठी मसाज थेरपीबद्दल मार्गदर्शन करतील.

याबद्दल संघाचे अध्यक्ष संजीव चुडीवाला म्हणाले, 'या इतिहासाचा भाग होताना आणि योग्य दिशेने पाऊल उचलताना मला आनंद होत आहे. महिला क्रिकेट संघाच्याबाबतीत हा खेळ खूप दूरपर्यंत आला आहे. कितीजण हा खेळ पाहतात.'

'खेळ ही खूप महान गोष्ट आहे. पण हे देखील सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे की खेळाच्या सपोर्ट स्टाफपर्यंत समानतेची तत्वे विस्तारली पाहिजेत. खेळाच्या सर्व क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग आणि यश यामुळे हे शक्य झाले आहे आणि नवनीता यांच्यामध्ये आम्हाला प्रतिभा सापडल्याने आम्ही आरसीबी खूप खूश आहोत.'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top