Wednesday, 27 Jan, 11.36 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघाच्या विजयाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे आता इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले असल्याने कर्णधारपदाची जबाबदारी आता रहाणेच्या खांद्यावर नसेल. परंतु उपकर्णधार म्हणून आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून रहाणेची कामगिरी भारतीय संघासाठी महत्वाची असेल.

मात्र सध्या रहाणे एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी रहाणे चेन्नईत दाखल झाला असून सरावाला सुरुवात करण्यापूर्वी तीन दिवस विलगीकरणात राहणे, सगळ्याच खेळाडूंना बंधनकारक आहे. त्यामुळे रहाणे देखील चेन्नईच्या एका हॉटेलमधील रूममध्ये कुटुंबासह विलगीकरणात आहे.

याच कालावधीतील रहाणेचा एक अतिशय गोड व्हिडिओ त्याच्या पत्नीने शेअर केला आहे. या व्हिडिओत रहाणेसह त्याची मुलगी आर्या देखील आहे. व्हिडिओत पार्श्वभूमीवर एक इंग्रजी गाणे लागले असून त्यावर रहाणे त्याच्या मुलीला नाच करायला शिकवतो आहे. रहाणेच्या पत्नीने हा व्हिडिओ शेअर करताना 'विलगीकरणातील विरंगुळा' अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, रहाणेसह रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर हे इतर दोन मुंबईकर खेळाडू देखील मंगळवारीच चेन्नईत दाखल झाले असून श्रीलंका दौऱ्यावर असलेला इंग्लंड संघही आजच चेन्नईत पोहोचला आहे. हे दोन्ही संघ आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून २ फेब्रुवारीपासून सरावाला सुरुवात करतील. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होईल.

महत्वाच्या बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top