Monday, 13 Jul, 6.01 pm महा स्पोर्ट्स

क्रिकेट
लाॅर्ड्सवर गांगुली त्या खेळाडूला म्हणाला, तू पण टी शर्ट काढ

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 13 जुलै 2002 ला नॅटवेस्ट वनडे मालिकेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहुन अंगावरील जर्सी काढत केलेले सेलिब्रेशन सर्वांच्याच आठवणीत राहिले.

तो क्षण सामन्यानंतर बऱ्याचदा टीव्हीवर दाखवण्यातही आला होता. गांगुलीच्या जर्सी काढून केलेल्या या सेलिब्रेशनची नंतर खूप चर्चा झाली.

या सामन्यात गांगुली भारताचे नेतृत्व करत होता, त्यावेळी भारतीय संघात व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, सचिन तेंडूलकर असे दिग्गज खेळाडूही होते.

या सेलिब्रेशनची ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शोमध्ये खुद्द गांगुलीनेच एक आठवण सांगितली होती. त्याने सांगितले की, "त्यावेळी मी उजव्या बाजूला उभा होतो. व्हीव्हीएस लक्ष्मण माझ्या डाव्या बाजूला होता आणि हरभजन माझ्या मागे होता. जेव्हा मी माझा टी-शर्ट काढत होतो तेव्हा लक्ष्मण मला असे करु नको हे सांगण्याचा प्रयत्न करत होता."

"मी शर्ट काढल्यानंतर हरभजनने मला विचारले आता मी काय करु, तर मी त्याला सांगितले तू पण टी-शर्ट काढ."

तसेच पुढे तो म्हणाला "ती कल्पना मला त्याचवेळी सुचली होती. त्यावेळी मला आठवले की अँड्र्यू फ्लिंटॉफने वानखेडेवर मालिका 3-3 अशी बरोबरीची झाल्यावर शर्ट काढून फिरवला होता. त्यामुळे मी विचार केला की लॉर्ड्सवर मी असेच करु शकतो."

"पण मला त्या घटनेचे आत्ता वाईट वाटते. माझ्या मुलीने एकदा विचारले होते की, 'तूम्ही असे का केले? क्रिकेटमध्ये असे गरणे गरजेचे आहे का?' त्यावेळी मी तीला सांगितले की, नाही मी ते चुकून केले होते. काही गोष्टी आयुष्यात अशा होतात ज्यांच्यावर आपण नियंत्रण ठेऊ शकत नाही."

खास लेख-

भारताच्या आजी- माजी क्रिकेटपटूंमध्ये हे ५ खेळाडू पाळतात अंधश्रद्धा

आपल्या गोलंदाजीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणारे ५ भारतीय क्रिकेटर्स

वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच

करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top