Thursday, 21 Jan, 9.52 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
.म्हणूनच पाकिस्तानचे खेळाडू भारतीय खेळाडूंप्रमाणे यशस्वी होत नाही, दिग्गजाचे मोठे भाष्य

मंगळवारी(१९ जानेवारी) भारतीय संघाने ब्रिस्बेन येेथ ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभूत केले आणि इतिहास घडवला. सन १९८८ नंतर पहिल्यांदाच ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पराभूत झाला. एवढेच नाही तर भारताने सगल दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने मात दिली. विशेष म्हणजे या मालिकेदरम्यान भारताने अनेक प्रमुख खेळाडू जखमी झाले होते. असे असतानाही युवा खेळाडूंनी कमी अनुभव असूनही शानदार कामगिरी करत बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. त्यामुळे सध्या भारतीय संघाचे खुप कौतुक होत आहे.

भारतीय संघाचे कौतुक केवळ भारतीयांनीच नाही तर अन्य देशांच्या आजी-माजी खेळाडूंनीही केले आहे. यात पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश आहे. आता पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद हाफीजने देखील भारतीय संघव्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की भारताप्रमाणे पाकिस्ताननेही खेळाडूंच्या प्रतिभेचा योग्य वापर करावा.

तो म्हणाला, 'भारताने कसोटी मालिकेत प्रत्येक विभागात ऑस्ट्रेलिया संघावर मात केली. भारताचा नियमीत कर्णधार मायदेशी परतला होता. तरीही ते मालिका २-१ असे जिंकले. भारताने अशी कामगिरी करण्यामागे त्यांनी खेळाडूंना घडविण्यासाठी राबविलेल्या योजना आहेत. त्यांनी ही कामगिरी बजावली, कारण त्यांचे केवळ प्रतिभाशाली खेळाडू खेळले असे नाही तर त्यांचे एका परिपूर्ण खेळाडू होण्यासाठीच्या एका प्रक्रियेतून गेलेले खेळाडू खेळले. पाकिस्तानमध्ये हेच होत नाही. पाकिस्तानमध्ये ती प्रक्रिया होत नाही. पाकिस्तानमध्ये केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये प्रतिभा असणारे खेळाडू खेळतात, पण ते एक परिपूर्ण खेळाडू होण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेतून जात नाहीत. त्यामुळे आपले खेळाडू मोठ्या स्तरावर खुप यशस्वी होत नाही. '

केवळ हाफिजच नाही तर शोएब अख्तर, शाहीद आफ्रिदी अशा काही दिग्गज पाकिस्तानी खेळाडूंनीही भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

ब्रिस्बेन कसोटी विजय -

ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या ३२ वर्षात कधीही ब्रिस्बेन येथील गॅबा स्टेडियमवर पराभूत झाला नव्हता. पण भारतीय संघाने अखेर गॅबाचा अवघड किल्लाही सर केला आणि ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांनंतर गॅबावर पराभूत करण्याची कामगिरी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सामन्याच्या ५ व्या दिवशी रिषभ पंत(८९*), शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पुर्ण केले.

या मालिकेत पहिल्या सामन्यात भारतीय संघ तीन दिवसातच पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने खेळाडूंना दुखापती होत असतानाही शानदार पुनरागमन करत मेलबर्न येथील दुसरा सामना जिंकला. त्यानंतर तिसरा सामना सिडनी येथे झाला. हा सामना भारताने अनिर्णित राखण्यात यश मिळवले आणि अखेर ब्रिस्बेन येथे ऐतिहासिक विजय मिळवला.

"शेवटी आई-वडील हे.." ब्रिस्बेन कसोटीतील गिलचे शतक हुकल्याने वडील नाराज, विरूने दिली प्रतिक्रिया

आयपीएल २०२१ - खेळाडूंना मुक्त केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक, घ्या जाणून

आयपीएल प्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी होऊ शकतो आयपीएल २०२१ चा लिलाव

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top