Thursday, 25 Feb, 12.12 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
मोदींना साथ देणार दिंडा! माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने केला बीजेपीत प्रवेश

भारताच्या दोन क्रिकेटपटूंनी आज पश्चिम बंगालमध्ये राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. दुपारी फलंदाज मनोज तिवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाला आणि संध्याकाळपर्यंत माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने आपण भाजपमध्ये सामील होत असल्याचे नक्की केले. यासह या दोन क्रिकेटपटूंची राजकीय खेळी सुरू झाली आहे. मैदानात आपल्या वेगवान चेंडूंनी अनेक फलंदाजांना पाणी पाजणाऱ्या दिंडाने पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि पक्षाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

पश्चिम बंगालमध्ये होणार आहेत निवडणुका
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होऊ शकते. दरम्यान, बंगालमध्ये नवीन चेहरे आणि जनमत असलेल्या नेत्यांचा आपापल्या पक्षामध्ये समावेश करण्याची स्पर्धा चांगलीच रंगली आहे. एकीकडे, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे अनेक भलेमोठे चेहरे भाजपमध्ये सामील झाले आहेत, तर दुसरीकडे बरेच नवीन चेहरेही राजकारणात आपले नशिब आजमावण्यासाठी पुढे येत आहेत.

दिंडाने जाहीर केली होती निवृत्ती
याच महिन्यात दिंडाने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने बीसीसीआयला एक मेल पाठवत आपल्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला. दिंडाने भारताकडून १३ वनडे आणि ९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दिंडाने वनडे सामन्यात १२ तर टी२० सामन्यात १७ गडी बाद केले आहेत.

हे क्रिकेटपटू बनले राजकारणी

भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर राजकारणात प्रवेश केला होता. कीर्ती आजाद, चेतन चौहान, मोहम्मद अजहरुद्दिन, मोहम्मद कैफ, गौतम गंभीर यांनीदेखील विविध पक्षांकडून निवडणुकांची रणधुमाळी अनुभवली आहे.

महत्वाच्या बातम्या:

व्हिडिओ : विवादित झेलामुळे स्टोक्स होतोय ट्रोल, चाहत्यांनी केली पॉंटिंगशी तुलना

INDvsENG 3rd Test Live: रोहित शर्माचे दमदार नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसाखेर भारताच्या ३ बाद ९९ धावा

ईशांत शर्माने उलगडली धोनीसह खेळलेल्या त्या सामन्याची आठवण, भावूक होत म्हणाला

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top