Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोहम्मद शमीने रचला इतिहास, पूर्ण केले 900 बळी!

मोहम्मद शमीने रचला इतिहास, पूर्ण केले 900 बळी!

मोहम्मद शमीने दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला. त्याने असा टप्पा गाठला आहे, जो यापूर्वी फक्त ५ भारतीय गोलंदाजांनाच गाठता आला होता. शमी ईस्ट झोनकडून खेळत असून, त्यांचा उपांत्य फेरीचा सामना सेंट्रल झोनविरुद्ध आजपासून सुरू झाला.

आज शमी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्त्वाखाली खेळला. या संघाचा कर्णधार इशान किशन असला, तरी पहिल्या दिवशी दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार म्हणून निवडलेल्या वैभवने संघाची कमान सांभाळली.

​दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल झोनचा पहिला डाव २६६ धावांवर आटोपला, आणि शेवटचा बळी पडताच पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा करण्यात आली. आर्यन जुयालने ४६ धावा केल्या, जो वैभवने घेतलेल्या रिव्ह्यूमुळे बाद झाला. वास्तविक पंचांनी त्याला 'नॉट-आऊट' दिले होते, परंतु त्यावेळी कर्णधारपद सांभाळणाऱ्या वैभवने रिव्ह्यू घेतला. रिंकू सिंगने ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाची धावसंख्या २६६ पर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुकेश कुमार आणि अभिजित सरकार यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि कुनैन कुरेशी यांनी प्रत्येकी २-२ बळी टिपले.

​शमीने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील पहिल्या डावात यश राठोडच्या रूपाने पहिला बळी घेतला. यानंतर त्याने अर्शद खानला १ धावेवर बाद केले, जो त्याचा दुसरा आणि या डावातील नववा बळी ठरला. या २ बळींसह त्याने आपल्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये ९०० बळी पूर्ण केले आहेत. फर्स्ट क्लास, लिस्ट-ए आणि टी-२० क्रिकेट मिळून ९०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

​शमीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ३७९, लिस्ट-ए मध्ये २८३ आणि टी-२० मध्ये २८० बळी घेतले आहेत. येत्या ३ तारखेला (सप्टेंबर) शमी त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करेल. त्याने भारतासाठी ६४ कसोटी, १०८ एकदिवसीय आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे २२९, २०६ आणि २७ बळी घेतले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports