Sunday, 24 Jan, 10.12 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
"मुलीच्या जन्मापेक्षा जास्त आनंद देशाकडून खेळण्यात होता", टी नटराजनचं मन जिंकणार वक्तव्य

नुकताच भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. या दौऱ्यातील टी२० आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजयी पताका झळकावली होती. भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन याच्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा अविस्मरणीय ठरला. कारण याच दौऱ्यावर नटराजनचे वनडे, टी२० आणि कसोटी पदार्पण झाले. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध या तिन्ही स्वरुपात दमदार कामगिरी करत नटराजनने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर आपल्या वक्तव्याने त्याने पुन्हा एकदा लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य असल्याचे नटराजनने सांगितले आहे. सोबतच देशासाठी खेळणे याचा आनंद आपल्या मुलीच्या जन्माच्या आनंदापेक्षा खूप मोठा असल्याचे भाष्य त्याने केले आहे.

भारतीय संघात संधी मिळण्याची अपेक्षा नव्हती- नटराजन

सलेम जिल्ह्यातील चिन्नाप्पामपट्टी येथे पत्रकारांशी बोलताना नटराजन म्हणाला की, "मी एक नेट गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो. मला अपेक्षा नव्हती की, मला भारताकडून एवढ्या लवकर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. परंतु जेव्हा मला सांगण्यात आले की, मला वनडे संघात स्थान मिळाले आहे. त्यानंतर मी खूप दबावात आलो होतो. परंतु मला संधीचा लाभ घ्यायचा होता. त्यामुळे मी धैर्याने मैदानावर उतरलो."

भारताकडून खेळण्याचा आनंद मुलीच्या जन्मापेक्षाही मोठा- नटराजन

पुढे बोलताना नटराजन म्हणाला की, "भारताकडून क्रिकेट खेळल्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. हा माझ्या जिवनातील सर्वात आनंदी क्षण होता. खरे तर, मला माझ्या मुलीच्या जन्मापेक्षा जास्त आनंद भारताकडून क्रिकेट खेळताना झाला होता. यावेळी आमचे संघ प्रशिक्षक आणि सर्व सहकाऱ्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी माझे समर्थन केले आणि मला खूप प्रोत्साहित देखील केले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी एवढे यश साध्य करू शकलो आहे."

तसेच नटराजनने विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली. "विराट आणि रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळून खूप चांगले वाटले. त्यांनी मला सांभाळून घेतले. मला त्यांच्याकडून बऱ्याच सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. सोबतच त्यांच्याकडून मला खूप प्रेरणाही मिळाली आहे," असे नटराजनने सांगितले.

नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

नटराजन हा आयपीएल २०२०चा भाग होता. यादरम्यान नटराजनच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले होते. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी आपली भारतीय संघात निवड झाल्याने नटराजन मायदेशी परतू शकला नाही. पुढे मनुका ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यातून नटराजनने वनडे पदार्पण केले. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर टी२० पदार्पण करत नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी२० सामने खेळले. यादरम्यान दमदार कामगिरी करत त्याने ६ विकेट्स चटकावल्या. एवढेच नव्हे तर, ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रहाणेने त्याची अंतिम ११ जणांच्या पथकात निवड केली. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण करत नटराजनने ४ विकेट्सची कामगिरी केली.

"नटराजनला स्टार्कची गोलंदाजी खेळतांना पाहून अजिंक्य रहाणेला भरली होती धडकी! 'हा' निर्णय घेण्याचाही केला होता विचार"

भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरला रिलीज करण्यास तामिळनाडू संघाचा नकार, 'हे' आहे कारण

क्या से क्या हो गया! दहा दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा टीम पेन झाला वॉटर बॉय

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top