Friday, 13 Dec, 6.23 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
मुंबई टी20मध्ये टीम इंडियाने केलेल्या दमदार कामगिरीबद्दल गांगुली म्हणाला.

बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai) येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात 3 सामन्याच्या टी20 मालिकेतील (3 Matches of T20 Series) अंतिम आणि निर्णायक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 67 धावांनी विजय (Won by 67 Runs) मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली.

या सामन्यानंतर बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारताने केलेल्या बेधडक फलंदाजीची प्रशंसा करत ट्वीट केले आहे.

"अनेकांना वाटले असेल की भारत ही मालिका जिंकेल. जिंकणे ही काही आश्चर्यकारक बाब नाही. भारताने केलेली बेधडक फलंदाजी ही प्रशंसा करण्यासारखी आहे," असे भारतीय संघाच्या फलंदाजीची प्रशंसा करताना गांगुलीने ट्वीट केले.

"कोणताच खेळाडू हा संघात आपले स्थान कायम करण्यासाठी खेळत नव्हता, सर्व खेळाडू हे सामना जिंकण्याच्या हेतूने खेळत होते," असेही गांगुली म्हणाला.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये तिसऱ्या टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 3 बाद 240 धावा केल्या. त्यानंतर विंडीजच्या संघाला भारतीय संघाने 8 बाद 173 धावांवर रोखले.

या टी20 मालिकेनंतर आता दोन्ही संघांमध्ये 15 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top