Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निवृत्त झालेल्या अजिंक्य रहाणेला BCCI कडून किती पेन्शन मिळणार? चार वर्षांपूर्वीच नियम बदलले

निवृत्त झालेल्या अजिंक्य रहाणेला BCCI कडून किती पेन्शन मिळणार? चार वर्षांपूर्वीच नियम बदलले

भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने 30 जुलै रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याचा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

त्यामुळे तो आता कोणत्याही क्रिकेटच्या प्रकारामध्ये खेळताना दिसणार नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर तो काय करणार आणि त्याच्या उत्पन्नाचे नवे साधन कोणते असेल.

रहाणेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) पुरेसे आर्थिक पाठिंबा मिळेल. BCCI निवृत्त खेळाडूंना दरमहा पेन्शन रक्कम देते. 2022 मध्ये पेन्शनच्या आकडेवारीमध्ये बदल करण्यात आला आहे.

रहाणेने भारतासाठी तब्बल 85 कसोटी सामने खेळले आहेत. यामुळे तो सर्वोच्च गटात येतो. आधी हा अनुभव असलेल्या निवृत्त खेळाडूंना दरमहा 50,000 रुपये मिळत होते, आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

रहाणेला BCCI कडून आता दरमहा 70,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. निवृत्तीवेतनामध्ये बदल करण्याचा निर्णय BCCI चे अध्यक्ष असताना सौरव गांगुलीने घेतला होता.

नियम बदलल्यावर गांगुली म्हणाला होता की, आपल्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या आर्थिक परिस्थितीची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडू ही आमची जीवनरेषा आहे आणि एक मंडळ म्हणून त्यांची कारकिर्द संपल्यानंतरही त्यांच्यासोबत असणे हे आमचे कर्तव्य आहे.

पेन्शनचे टप्पे आणि दर
कसोटी क्रिकेटपटू (25+ कसोटी) - 70,000 रुपये प्रति महिना
कसोटी क्रिकेटपटू (10-24 कसोटी/ कनिष्ठ गट) - 60,000 रुपये प्रति महिना
आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू - 52,500 रुपये प्रति महिना
प्रथम श्रेणी/ देशांतर्गत महिला खेळाडू - 45,000 रुपये प्रति महिना
प्रथम श्रेणी पुरुष खेळाडू (सामन्याच्या स्तरानुसार) - 30,000 ते 45,000 रुपये प्रति महिना
माजी पंच - 45,000 रुपये प्रति महिना

पेन्शनसाठी पात्र होण्यासही काही अटी आहेत, त्या पुढीलप्रमाणे…
जर एखादा खेळाडू BCCI मध्ये एखाद्या पदावर काम करत असेल (राष्ट्रीय प्रशिक्षक किंवा राष्ट्रीय निवडकर्ता) तर त्याची पेन्शन स्थगित केली जाते. ते पद सोडले तर त्या खेळाडूची पेन्शन पुन्हा सुरू केली जाते.

तसेच मीडियामधील काम, समालोचन किंवा आयपीएल फ्रॅंचायझी मार्गदर्शनाचा पेन्शनवर परिणाम होत नाही.

पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पात्र ह्यात असलेल्या जोडीदाराला मासिक पेन्शनच्या 50% रक्कम मिळते. पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पात्र ह्यात असलेल्या जोडीदाराला मासिक पेन्शनच्या 50% रक्कम मिळते. तसेच लाभार्थी इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अंतर्गत 10 लाख रुपये पर्यंतच्या संयुक्त वैद्यकिय विमा संरक्षणासाठी पात्र. (How much pension will retired Ajinkya Rahane receive from the BCCI?)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports