Monday, 25 Jan, 10.44 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
फ्लाईंग बॅट, ब्रेकिंग बॅट, क्रॅकिंग बॅट! आयसीसीने शेअर केला तुटलेल्या बॅट्सचा मजेशीर व्हिडिओ

क्रिकेटच्या मैदानात अनेक मजेशीर घटना घडत असतात. मग कधीने मजेशीरपद्धतीने झेल सुटतो, कधी आपल्याच संघसहकाऱ्याला चेंडू लागतो, कधी फलंदाज धावा घेताना एकाच दिशेने पळतात. अशा अनेक घटना पाहून प्रेक्षकांना हसू आवरत नाही. याबरोबर क्रिकेट मैदानावर अनेकदा घडणारी घटना म्हणजे फलंदाजाची बॅट तुटणे किंवा उडून दुसरीकडे पडणे. याचाच एक व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की काही फलंदाजांची बॅट चेंडू मारताना दुसरीकडे उडून पडली. यात सौरव गांगुली, रिषभ पंत, तिलत्करने दिल्शान अशा काही फलंदाजांची बॅट उडून पडताना दिसत आहे.तर काहींच्या बॅटला चेंडूला फटका मारल्यानंतर तडा गेला आहे. तर काहींची बॅट जमीनीला घासून तुटली आहे. यात माहेला जयवर्धने, ओएन मॉर्गन अशा काही फलंदाजांचा समावेश आहे.

या व्हिडिओला आयसीसीने मजेशीर कॅप्शन दिले आहे की 'फ्लाईंग बॅट, ब्रेकिंग बॅट, क्रॅकिंग बॅट!' (उडणारी बॅट, तुटलेली बॅट, तडा गेलेली बॅट). याबरोबरच आयसीसीने पुढे गमतीने लिहिले आहे की 'आयसीसी ऍडमिनने एक वेगळा व्हिडिओ करायला व्हिडिओ एडिटरला सांगितले. त्यावर व्हिडिओ एडिटर म्हणाला, नक्की काय करायचे आहे? यावर आयसीसी ऍडमिनने उत्तर दिले की तू आयसीसी स्पर्धांमधील बॅट तुटलेले आणि उडालेल्या बॅटचे व्हिडिओ शोधू शकतो का?'

या व्हिडिओला आयसीसीने थोडे एडिट करुन त्याला काहीसा गमीतीशीर केला आहे. हा व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून त्यावर विविध प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

यावेळी काहींनी अशीही आठवण करुन दिली की २०११ च्या विश्वचषकात गौतम गंभीरच्या तुटलेल्या बॅटचा व्हिडिओ यात नाही. तसेच काहींनी आणखी काही घटना अशा घडल्या असल्याचेही सांगितले आहे.

शॉन पोलॉकबरोबर ४ वर्षांच्या मार्नस लॅब्यूशेनच्या 'त्या' फोटोमागील एक मनोरंजक कथा, घ्या जाणून

घरी पैसे नसल्याने आईने स्वत: शिवले होते पुजारासाठी बॅटिंग पॅड, त्यागाची कहाणी आहे अतिशय भावनिक

वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top