Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'पॉवरप्ले किंग' वैभव सूर्यवंशी! 'बेबी बॉसने' SRH विरुद्ध एलिमिनेटरमध्ये आयपीएलचा 10 वर्ष जुना रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

'पॉवरप्ले किंग' वैभव सूर्यवंशी! 'बेबी बॉसने' SRH विरुद्ध एलिमिनेटरमध्ये आयपीएलचा 10 वर्ष जुना रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

राजस्थान रॉयल्सचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने बुधवारी (27 मे) आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात एक धमाकेदार खेळी केली. सनरायझर्स हैद्राबादविरुद्धच्या या सामन्यात 15 वर्षीय या खेळाडूचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले.

मुल्लाणपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 29 चेंडू खेळत 5 चौकार आणि 12 षटकारांच्या सहाय्याने ९७ धावा केल्या. यामध्ये जेव्हा त्याने 20 चेंडूंत 60 धावा केल्या होत्या, तेव्हा त्याने एका बलाढ्य विक्रमाला गवसणी घातली.

वैभव आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये (1-6 षटकांत) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएलच्या या 19 हंगामातील 15 सामन्यांमध्ये पहिल्या सहा षटकांत 490 धावा करत 10 वर्ष जुना विक्रम मोडला आणि नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली. यावेळी त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. वॉर्नरने 2016 मध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून खेळताना पॉवरप्लेमध्ये 467 धावा केल्या होत्या. तो सध्या आयपीएलमध्ये खेळत नाही. तसेच या यादीत तिसऱ्या स्थानी त्याचाच संघ सहकारी ट्रेव्हिस हेड आहे. त्याने 2024 च्या हंगामात पॉवरप्लेमध्ये 402 धावा केल्या होत्या.

आयपीएल हंगामात सर्वाधिक पॉवरप्ले (1-6 षटके) धावा
490 - वैभव सूर्यवंशी (2026)*
467 - डेव्हिड वॉर्नर (2016)
402 - ट्रेव्हिस हेड (2024)
402 - साई सुदर्शन (2025)
382 - ऍडम गिलख्रिस्ट (2009)

वैभवच्या खेळीमुळे आरआरने एसआरएचविरुद्ध 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 243 धावसंख्या उभारली. आपल्या खेळीदरम्यान वैभवने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तो आता एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 65 षटकार मारून ख्रिस गेलचा (59) विक्रम मागे टाकला आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना एसआरएचच्या फलंदाजीची सुरूवात म्हणावी तशी झाली नाही. अभिषेक शर्मा शून्यावर तंबूत परतला. बाकी फलंदाजांनीही निराशा केली. सर्वाधिक धावा नितीश कुमार रेड्डीने केल्या. त्याने 38 (20) धावा केल्या. एसआरएचचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत 196 धावांवर गारद झाला आणि सामना 47 धावांनी गमावला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports