Thursday, 29 Oct, 11.32 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
पृथ्वी शॉ नाही तर आता 'हा' धुरंधर करणार ओपनिंग; प्लेऑफपुर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय

आयपीएल २०२० मधील युवा खेळाडूंचा भरणा असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. मात्र गेल्या तीन सामन्यांपासून त्यांची गाडी डगमगडली आहे. तरीही दिल्लीने गुणतक्यात टॉप-४ संघातील आपले स्थान गमावलेले नाही. यामागचे कारण म्हणजे, त्यांच्या खेळाडूंनी एकजुटीने केलेले प्रदर्शन आणि त्यांना संघाकडून मिळालेली सुरक्षेची भावना. मात्र साखळी फेरीतील त्यांच्या उर्वरित सामन्यात युवा फलंदाज पृथ्वी शॉला संधीची वाट पाहावी लागणार आहे.

पृथ्वी शॉचा फॉर्म बिघडला

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या जोडीने यावर्षी दिल्लीच्या सुरुवातीच्या १० सामन्यात सलामीला फलंदाजी केली होती. दरम्यान धवनने त्याच्या फलंदाजीत सातत्य राखत ४००पेक्षा जास्त धावा केल्या. पण सुरुवातीच्या काही सामन्यानंतर शॉचा फॉर्म बिघडला आणि तो १० सामन्यात केवळ २०९ धावाच करुच शकला.

अजिंक्य रहाणेला सलामीला संधी

त्यामुळे गेल्या २ सामन्यात संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला सलामीला संधी देण्यात आली. पण हा धुरंधर त्या २ सामन्यात एका गोल्डन डकसह बाद होत २६ धावाच करु शकला. असे असले तरी, मागील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने काही नेत्रदिपक शॉट लगावले होते. त्यामुळे साखळी फेरीतील दिल्लीच्या उरलेल्या २ सामन्यातही रहाणेला सलामीला पाठवले जाण्याची चर्चा चालू आहे.

याविषयी दिल्ली संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "खेळाडूंना दबावाच्या परिस्थितीतही उत्स्फूर्त ठेवणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही असे तेव्हाच करु शकता, जेव्हा तुम्ही त्यांना सुरक्षिततेची भावना देता. परंतु, आता साखळी फेरीतील उरलेले सामने सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पृथ्वी शॉला सुरुवातीच्या १० सामन्यात संधी देण्यात आली होती. त्यामुळे आता पुढे त्याला संधीची वाट पाहावी लागणार आहे."

या विधानाद्वारे अप्रत्यक्षपणे त्या अधिकाऱ्याने अजिंक्य रहाणेला पुढील सामन्यात सलामीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

दिल्ली कॅपिटल्स गुणतक्यात तिसऱ्या स्थानी

श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत आयपीएल २०२०चे १२ सामने खेळले आहेत. त्यातील ७ सामन्यात त्यांनी विजयाची पताका झळकावली आहे, तर ५ सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे १७ गुण आणि ०.०३० नेट रन रेटसह हा संघ गुणतक्यात तिसऱ्या स्थानावर आहे.

का चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीला मिळतो इतका सन्मान? माजी क्रिकेटरने सांगितले कारण

जोफ्रा म्हणतोय, "आयपीएलच्या 'या' दिवसांना मी कंटाळलोय, मला मुक्त करा"

.म्हणून धोनीची सीएसके यावर्षी ठरली सुपर-डुपर फ्लॉप; दिग्गजाने सांगितले कारण

ट्रेडिंग लेख-

Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

SRH विरुद्ध केलेल्या 'या' तीन चुकांमुळे DC चं 'प्ले ऑफ' तिकीट लांबणीवर

हैदराबादचे 'हे' पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top