राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 221 धावांचं लक्ष्य गाठत आयपीएल 2026 मध्ये मोठा इतिहास रचला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियम मैदानावर राजस्थानने 19.1 षटकांत 3 विकेट्स गमावून 225 धावा करत दमदार विजय मिळवला.
या विजयासह राजस्थानने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आयपीएल इतिहासात चौथ्यांदा 220 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य यशस्वीरीत्या पार केलं. त्यामुळे सर्वाधिक वेळा 220+ धावांचा पाठलाग करून विजय मिळवणारा राजस्थान हा आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे. याआधी हा विक्रम पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या नावावर संयुक्तपणे होता.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 220+ धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ:
4 वेळा - राजस्थान रॉयल्स
3 वेळा - पंजाब किंग्स
3 वेळा - सनरायझर्स हैदराबाद
2 वेळा - मुंबई इंडियन्स
जयपूरमध्ये यंदाच्या हंगामात प्रत्येक सामन्याच्या पहिल्या डावात 220 किंवा त्यापेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. त्यापैकी तीन वेळा लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झाला. मात्र एका सामन्यात राजस्थानलाच मोठं लक्ष्य गाठण्यात अपयश आलं होतं.
या विजयानंतर राजस्थान रॉयल्सच्या खात्यात आता 14 गुण झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. अखेरचा सामना जिंकला तर राजस्थान सहज टॉप-4 मध्ये प्रवेश करू शकतो. मात्र पराभव झाल्यास संघाला इतर निकालांवर अवलंबून राहावं लागू शकतं.
या सामन्यात यशस्वी जयस्वालने राजस्थानचं नेतृत्व केलं. नियमित कर्णधार रियान पराग दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही.

