Monday, 18 Jan, 11.20 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
रणजी स्पर्धेच्या आयोजनावरून बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद, सौरव गांगुली 'या' मतावर ठाम

कोरोना काळानंतर भारतात स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली असून सध्या सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीचा थरार क्रिकेट रसिकांना बघायला मिळत आहे. आगामी काळात देखील भारतात स्थानिक क्रिकेटच्या इतर स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. यासंदर्भात रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या मीटिंगमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली रणजी ट्रॉफी स्पर्धा आयोजनावर ठाम आहेत.

सौरव गांगुली यांच्या मते रणजी ट्रॉफी स्पर्धा ही भारतातील सर्वात मोठी स्थानिक स्पर्धा असून, तिचे आयोजन होणे गरजेचे आहे. इतर सदस्यांच्या मते 50 षटकांची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळावी. दोन्ही स्पर्धा आयोजित करताना बायोबबल महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये देशभरातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी मिळते. गांगुली यांच्या मते रणजी ट्रॉफी स्पर्धा होणे हे प्रत्येक खेळाडूसाठी गरजेचे असणार आहे. मात्र बीसीसीआयच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मते 4 दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये बायोबबल बाबत बरीच कठोरता आणावी लागेल.

इतर पदाधिकाऱ्यांच्या मते विजय हजारे ट्रॉफी कमी कालावधीमध्ये संपन्न होऊ शकते व बायोबबलमध्ये तितकासा अडथळा येणार नाही. सौरव गांगुली व इतर सदस्यांच्या मतांमध्ये भिन्नता असल्याने अद्याप तरी कुठलाही जाहीर निर्णय घेण्यात आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव

आयएसएल २०२०-२१ : दहा खेळाडूंनिशी ईस्ट बंगालने चेन्नईयीनला रोखले

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top