Dailyhunt
ऋषभ पंतकडून काहीतरी शिका! युवराज सिंगने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला म्हटले 'बेशर्म', जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

ऋषभ पंतकडून काहीतरी शिका! युवराज सिंगने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला म्हटले 'बेशर्म', जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगला (Yuvraj Singh) गोल्फची खूप आवड आहे. निवृत्तीनंतर तो गोल्फ खेळतो आणि नेहमीच चर्चेत असतो. आयपीएल 2026 पूर्वी युवराज सिंगने ऋषभ पंतला (Rishbh pant) फलंदाजीचे धडे दिले होते.

त्यानंतर ऋषभ पंतने आयपीएल 2026 दरम्यान त्याला एक खास भेट दिली. आता ही भेट मिळाल्यानंतर युवराज सिंगने अभिषेक शर्मा, शुभमन गिल यांच्यासह 7 क्रिकेटपटूंना 'बेशर्म' म्हटले आहे.

ऋषभ पंतने युवराज सिंगला एक गोल्फ बॅग भेट दिली. पंतने युवीला एक संदेशही पाठवला, ज्यामध्ये त्याने म्हटले की, प्रिय युवी पाजी, तुमच्या सपोर्ट आणि मार्गदर्शनासाठी धन्यवाद. गोल्फ कोर्सवर भेटूया. खूप सारे प्रेम, आरपी." यानंतर युवराज सिंगने मजेशीर शैलीत शुभमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, नमन धीर, अब्दुल समद यांना उद्देशून म्हटले की, "बेशर्मों, तुम्हाला लाज वाटत नाही का?" युवराजने असे म्हटले कारण या खेळाडूंनी युवीला अजूनपर्यंत अशी कोणतीही भेट दिलेली नाही. अशा परिस्थितीत युवीने हसण्याचे इमोजी वापरून मजेशीर अंदाजात या खेळाडूंना 'बेशर्म' म्हटले.

युवराज सिंगने शुभमन गिल, अभिषेक शर्मा यांच्या व्यतिरिक्त या खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे युवीचे त्यांच्याशी खास नाते आहे. ऋषभ पंतने टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत 4 दिवस सराव केला होता. मात्र, त्यानंतरही तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपली जागा निर्माण करू शकला नाही.

ऋषभ पंतचा आयपीएल 2026 मधील प्रवास अडचणींनी भरलेला राहिला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 9 डावांमध्ये 25.50 च्या सरासरीने 204 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही खूप कमी राहिला आहे. त्याने 128.30 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. पंतचे कर्णधारपदही आयपीएल 2026 मध्ये फ्लॉप ठरले. त्याचा संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे. संघाचा प्लेऑफच्या शर्यतीतील प्रवास जवळपास संपला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports