Friday, 13 Dec, 1.42 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
संघाबाहेर असणारा हा खेळाडू म्हणतो, 'गांगुलीकडून आशा आहे, या परिस्थितीतून गेला आहे'

भारताचा माजी सलामीवीर मुरली विजय सध्या सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध तामिळनाडूकडून खेळत आहे. त्याने 61 कसोटीत 3982 धावा केल्या असून तो सध्या भारतीय संघाबाहेर आहे.

त्याने अखेरचा सामना डिसेंबर 2018 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, त्या सामन्यात भारत 146 धावांनी पराभूत झाला. यानंतर त्याला पुनरागमन करायला मिळाले नाही. मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांनी सध्या सलामी फलंदाज म्हणून कसोटीमध्ये जागा पक्की केली आहे. तथापि, विजयने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडून पुनराआगमनाची अपेक्षा आहे.

2013- 2015 दरम्यान विजयने परदेशी दौऱ्यावर चांगली कामगिरी केली होती, परंतु अनेक खेळाडूंच्या आगमनामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. स्पोर्टस्टारने दिलेल्या वृत्तानुसार विजय म्हणाला, "सौरवमुळे मला आशा आहे हे सर्व काही बदलेल. आपल्या कारकीर्दीत तो या परिस्थितीतून गेलेला आहे आणि त्याने दमदार पुनरागमनही केले आहे. अशा या परिस्थितीत एका क्रिकेटपटूच्या भावनांबद्दल त्याला जाणीव आहे."

विजय विशेषत: नाराज होता की भारत ए आणि दिलीप ट्रॉफी साठी त्याला वगळण्यात आले होते. विजयचे म्हणणे आहे की खेळाडूंना पुनरागमन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध पाहिजे.

विजय म्हणाला, "हा नक्की माझा मुद्दा आहे. मी फक्त माझ्याबद्दल बोलत नाही. मी वगळलेल्या क्रिकेटपटूंबद्दल बोलत आहे, त्यांच्याकडे पुनरागमन करण्यासाठी व्यासपीठ असले पाहिजे. हे एक जंगलात काट-छाट करण्यासारखे असू नये. जेव्हा तुम्ही जाणता की उच्च पातळीवर चांगली कामगिरी करू शकता परंतु कनिष्ठ पातळीवर तूम्ही खेळत आहात तेव्हा हे स्विकारणे कठिण असते."

तसेच विजय असेही म्हणाला की त्याला कोणतीही माहिती न देता खेळाडूंच्या करारातून वगळण्यात आले. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे.

विजय पुढे म्हणाला, "मी भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा एक मोठा चाहता आहे, पण त्यानंतर काय? की मी फक्त पुनरागमनाची स्वप्न पाहत राहू? त्यासाठी काही रचना आहे का ज्यामुळे हे शक्य होईल?'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top