Thursday, 05 Sep, 2.20 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
संजय बांगर अडकले संकटात, जर 'असे' झाले तर बीसीसीआय करणार चौकशी

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी संजय बांगर यांच्या ऐवजी विक्रम राठोडची निवड केली आहे. हा एकमेव बदल वगळता बीसीसीआयने कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर असताना बीसीसीआयने ही सपोर्ट स्टाफची निवड केली आहे. फलंदाजी प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या बांगर यांनी भारताच्या या वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय निवड समीती सदस्य देवांग गांधी यांच्याशी वाद घातल्याच्या चर्चा समोर येत आहेत.

बांगर यांनी गांधींच्या हॉटेल रुममध्ये जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर या प्रकरणाबाबत वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यान भारताचे व्यवस्थापक असणारे सुनील सुब्रमण्यम आणि मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी अधिकृत रिपोर्ट दाखल केला तर बांगर यांना बीसीसीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

याबद्दल बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारीनी पीटीआयला माहिती दिली की 'अशा परिस्थितीत नियमावलीनुसारच जायला हवे. सर्वात आधी बांगर यांनी ज्यांच्याशी बाद घातला आहे ते राष्ट्रीय निवडकर्ते गांधी यांनी अधिकृत तक्रार दाखल करायला हवी.'

त्याचबरोबर बीसीसीआयच्या अधिकारीने बांगर आणि गांधी यांच्यातील वादाला पुष्टी दिली असली तरी बांगर हे आता बीसीसीआयशी करारबद्ध नसल्याने त्यांना हे प्रकरण पुढे वाढेल याची खात्री नाही.

तसेच अधिकारी पुढे म्हणाले, 'प्रशासकीय व्यवस्थापक सुब्रमण्यम यांना आपल्या रिपोर्टमध्ये या घटनेचा उल्लेख करावा लागेल. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही अशी घटना झाल्याचे लिखित स्वरुपात द्यावे लागेल. जर असे झाले नाही तर सीओएसमोर(प्रशासकिय समीती) हे सर्व प्रकरण घेऊन जाण्याचा प्रश्नच येत नाही. '

याबरोबरच एक अधिकारी म्हणाले, 'पदावरून हटवण्यात आल्यानंतर कोणीही नाराज होऊ शकते. पण त्यांना असे का वाटले की त्यांचा कार्यकाळ वाढवण्यातच येईल. शास्त्री, अरुण आणि श्रीधर यांचे प्रदर्शन चांगले होते म्हणून त्यांची फेरनिवड करण्यात आली.

'पण बांगर यांचे प्रदर्शन चांगले नसल्याने त्यांना हटवण्यात आले. जर असे असेल तर बांगर यांनी गांधींना याबद्दल प्रश्न विचारायला नको होते. गांधींवर चिडण्यात काहीच अर्ध नाही.'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top