Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सेहवाग-द्रविड यांचे चिरंजीव धुमाकूळ घालण्यास सज्ज, BCCI ने अंडर-19 संघ केला जाहीर

सेहवाग-द्रविड यांचे चिरंजीव धुमाकूळ घालण्यास सज्ज, BCCI ने अंडर-19 संघ केला जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरूवारी (27 ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील पुरुष संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय 19 वर्षांखालील संघाची घोषणा केली आहे. एकदिवसीय संघाचे नेतृत्व लक्ष्य रायचंदानी करेल, तर बहुदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद यशवर्धन चौहान सांभाळेल.

एकदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या संघाने लक्ष वेधले आहेत. यामध्ये दोन नावे क्रिकेट रसिकांच्या चांगलीच ओळखीची आहेत, द्रविड आणि सेहवाग.

भारतीय पुरुष निवड समितीने ऑस्ट्रेलिया U19 संघाच्या आगामी भारत दौऱ्यासाठी भारतीय U19 संघांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये तीन एकदिवसीय आणि दोन बहुदिवसीय सामन्यांचा समावेश आहे.

त्यामधील एकदिवसीय संघात दिग्गज आणि सध्याचे क्रिकेट तज्ज्ञ वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग, माजी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा सेहवाग-द्रविड जोडी एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहे.

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या 18 वर्षाच्या आर्यवीरला पहिल्यांदाच भारतीय संघात सामील करण्यात आले आहे, तर अन्वयने त्याचे स्थान कायम ठेवले आहे. तो मागील महिन्यात श्रीलंका दौऱ्यात गेलेल्या भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा भाग राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही बहु स्वरुपाची मालिका 18 सप्टेंबरपासून एकदिवसीय प्रकारच्या सामन्याने सुरू होणार आहे. दुसरा सामना 21 सप्टेंबर आणि तिसरा सामना 23 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. तसेच पहिला बहुदिवसीय सामना 27 ते 30 सप्टेंबर आणि दुसरा बहुदिवसीय सामना 5 ते 8 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

तीन एकदिवसीय सामने आणि पहिला बहुदिवसीय सामना राजकोटमध्ये, तर दुसरा बहुदिवसीय सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.

एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा अंडर 19 संघ
लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (विकेटकीपर), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (विकेटकीपर), व्ही. यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपती व्यंकट, काव्य पटेल.

बहु-दिवसीय सामन्यांसाठी भारताचा अंडर 19 संघ
यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (विकेटकीपर), अभिप्रय बिस्वास (विकेटकीपर), रोहित यादव, इशान ओम, अयान अक्रम, प्रणव रागवेंद्र, प्रियांशु सिंग, मोहित उलवा, आर्यन यादव.

(Rahul Dravid son Anvay Dravid and Virender Sehwag son Aaryavir Sehwag have been named in India's U19 squad for One-Day series vs Australia)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports