Thursday, 21 Jan, 4.37 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला 'तो' गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच बॉर्डर गावसकर मालिका पार पडली. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेतील शेवटचा सामना गाबा येथे खेळला गेला होता. ज्यामध्ये रिषभ पंतने दमदार 89 धावांची नाबाद खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. ज्यामुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षांव करण्यात आला. त्यानंतर आता आयसीसीने सुद्धा सोशल मीडियावर रिषभ पंत विषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

आयसीसीने बुधवारी(21 जानेवारी) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून रिषभ पंतने स्पायडरमॅनची वेशभूषा परिधान केलेला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये गाण्याच्या स्वरात लिहले आहे की, "स्पायडर पंत, स्पायडर पंत. एक कोळी जो काहीही करू शकते. षटकार मारतो, झेल घेतो, भारताला सामना जिंकवून देतो."

रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला चिडवले होते.

बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा सामना सिडनीत खेळला गेला. या सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने भारतीय संघाच्या दुसर्‍या डावात रविचंद्रन अश्विन फलंदाजी करताना त्याला स्लेजींग केली होती. त्याचबरोबर चौथ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने टीम पेनला चिडवले होते. तसेच फलंदाजी दरम्यान टीम पेन स्ट्राईकवर येताच पंतने गाणे गायला सुरुवात केली. "स्पायडरमॅन- स्पायडमॅन, तूने चुराया मेरे दिल का चैन" हे गाणे गायले होते. त्याचा हा आवाज स्टंपवर लावलेल्या माइकमध्ये रेकॉर्ड झाला होता.

चाहते म्हणाले, पेनला पंतकडून शिकण्याची गरज आहे.

एका युजरने लिहले, हा ऑस्ट्रेलियन उन्हाळय़ातील सर्वात चांगला क्षण आहे. दुसर्‍या युजरने लिहले,' पेन रिषभ पंतकडून काही शिक.

भारताने 328 धावांचे लक्ष्य पार केले

ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 96.6 षटकांत 7 विकेट्स गमावून 329 धावा केल्या. त्याचबरोबर 3 विकेट्सने हा सामना जिंकला आणि मालिका आपल्या नावावर केली. तसेच गाबाच्या मैदानावर पहिल्यांदा 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य पार केले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने चौथ्या डावात आपले सर्वात मोठे लक्ष्य पार केले.

विमानतळावरुन सिराजने धरली थेट स्मशानभूमीची वाट अन् वडिलांना वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून पाणावतील डोळे

धोनीचा तो रोल मिळावा म्हणून सुशांत सिंग रजपूतने घेतली होती केवळ एवढी रक्कम

आरसीबी संघाने करारमुक्त केल्यावर पार्थिव पटेलने ट्विटरवर व्यक्त केल्या भावना, म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top