Thursday, 14 Jan, 8.12 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
थोडेथोडके नाही तर तब्बल १७ षटकारांची आतषबाजी करत 'या' भारतीय खेळाडूने रचले वर्ल्ड रेकॉर्ड्स

भारतात कोरोनानंतर पहिल्यांदाच देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात झाली असून, सध्या सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेटचा थरार बघायला मिळत आहे. यादरम्यानच नुकत्याच खेळल्या गेलेल्या मेघालय आणि मिझोराममधील सामन्यात, मेघालयचा कर्णधार पूनित बिष्टने मैदानावर चौकार व षटकारांची आतषबाजी करत केवळ 51 चेंडूत 146 धावांची अविश्वसनीय खेळी केली. या खेळी दरम्यान बिष्टने 6 चौकार व तब्बल 17 षटकार ठोकले आहेत. यासोबतच बिष्टने आपल्या दमदार खेळीमुळे चौथ्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम देखील आपल्या नावे केला आहे.

बिष्ट टी20 क्रिकेटमध्ये चौथ्यां क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा बनविणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या दसून शनकाच्या नावे होता. शनकाने 2016साली सिंहाली क्लबकडून खेळताना 131 धावांची खेळी केली होती.

यष्टीरक्षक म्हणूनही सर्वोच्च खेळी -

यष्टिरक्षक म्हणून टी20 क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम देखील बिष्टने आपल्या नावे केला आहे. यापूर्वी यष्टीरक्ष म्हणून सर्वात मोठी खेळी केली होती ती के एल राहुलने. 2020 आयपीएलमध्ये राहुलने 131 धावा केल्या होत्या.

बिष्टने आपल्या खेळीत तब्बल 17 षटकार ठोकत एका टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेल सोबत संयुक्तपणे दुसरे स्थान गाठले आहे. गेलने आयपीएल 2013 साली बेंगलोर संघाकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरुद्ध 17 षटकार ठोकले होते.

तसेच बिष्ट टी20 क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंद्वारे एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. बिष्टने यावेळी श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला. अय्यरने 2019 साली सिक्कीम विरुद्ध 15 षटकार ठोकले होते.

ब्रिस्बेन कसोटीसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ, पुकोस्कीच्या जागेवर 'या' खेळाडूला संधी

दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या जागी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी 'हे' तीन खेळाडू प्रमुख दावेदार

चौथ्या सामन्यात विल पुकोवस्कीच्या जागी 'या' खेळाडूला दिली जावू शकते संधी, प्रशिक्षकांनी दिले संकेत

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top