Wednesday, 27 Jan, 7.28 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह, मुकणार 'या' स्पर्धेला

गतवर्षी जगभरात थैमान घालणारा कोरोना (कोविड १९) हा आजार नव्या वर्षातही पाठ सोडायला तयार नाही. क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर अनेक बंधने घातल्यानंतर क्रीडाविश्व नव्याने सुरू होत असतानाच क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडीज संघाचा प्रमुख फलंदाज शाई होप व त्याचा भाऊ कायले होप या दोघांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत. परिणामी हे दोघेही वेस्ट इंडीजमधील प्रमुख स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. या दोघांचीही कोरोना चाचणी रविवारी घेण्यात आली होती.

क्रिकेटपटू भावंडांचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

वेस्ट इंडीज क्रिकेट संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणारा शाई होप आणि त्याचा क्रिकेटपटू भाऊ कायले होप या दोघांचे कोरोना अहवाल सकारात्मक आल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे हे दोघेही ७ फेब्रुवारीपासून अॅटिग्वा येथे सुरू होणाऱ्या देशांतर्गत सीजी सुपर ५० या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. ही स्पर्धा २७ फेब्रुवारीपर्यंत चालेल.

क्रिकेट मंडळाने केली घोषणा

होप बंधू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना सुपर ५० कप साठीच्या बार्बाडोस संघातून वगळण्यात आले आहे. बार्बाडोस क्रिकेट संघाने याबाबतची अधिकृत घोषणा केली. त्यांनी यावेळी म्हटले की, "शाई आणि कायले यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे या दोघांनाही ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सीजी सुपर ५० स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. बार्बाडोस सरकारच्या नियमानुसार या दोघांनाही विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आशा आहे की ते लवकर बरे होतील."

बदली खेळाडूंची केली घोषणा

शाई व कायले होप हे स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर त्यांच्या जागी बार्बाडोस क्रिकेट संघाने १५ सदस्यीय संघात यष्टीरक्षक टेवेन वॉलकॉट व सलामीवीर जाचारी मेकेसी यांना सामील केले आहे. शाई होपने वेस्ट इंडीजसाठी आत्तापर्यंत ३४ कसोटी, ७८ वनडे व १३ टी२० सामने खेळले आहेत. तर, कायले याने ५ कसोटी व ७ वनडे सामने वेस्ट इंडीजसाठी खेळलेत.

महत्वाच्या बातम्या:

भारतासाठी असे आहे आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचे समीकरण; इंग्लंड विरुद्ध या फरकाने जिंकावी लागेल मालिका

आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर राशिदने केले मोठे वक्तव्य, म्हणाला

विराट सापडला कायद्याच्या कचाट्यात, मिळाली कायदेशीर नोटीस

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top