Friday, 13 Dec, 7.30 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
व्हिडिओ: .म्हणून वॉर्नर साऊथीला म्हणाला, 'तू चांगला व्यक्ती होता'

न्यूझीलंड क्रिकेट संघातील खेळाडू मैदानावर शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पण पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या एका कृतीवर मात्र ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर चांगलाच भडकला होता

टीम साऊथीने सामन्याच्या सातव्या षटकात दबाव आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन सलामीवीर रोरी बर्न्सनकडे मुद्दाम चुकीचा थ्रो फेकला, ज्यामुळे नॉन-स्ट्राइकवर ऊभा असलेला डेव्हिड वॉर्नर त्याच्यावर भडकला.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात वॉर्नरबरोबर रोरी बर्न्स सलामीला फलंदाजीला आला. रोरी सातव्या षटकातील पहिला चेंडू खेळत होता, तो 5 धावांवर होता. टिम साऊथीने यॉर्करचा चेंडू फेकला तो रोरीने चांगला खेळला, पण चेंडू साऊथीच्या हातात गेला तेव्हा त्याने जोरात चेंडू रोरीकडे फेकला.

चेंडू रोरीच्या पॅडला लागला. जरी रॉरीने साऊथीच्या कृतींबद्दल काहीही बोलला नाही, तो बघतच राहिला हे काय झाले . साऊथीही माफी न मागता हसत निघून गेला , परंतु वॉर्नर मात्र भडकला. जापले. वॉर्नर-साऊदी यांच्यात चर्चा झाली.

साऊदी म्हणाला, 'तो बाहेर होता.' वॉर्नरने उत्तर दिले, 'हा चेंडू त्याच्या हाताला लागला आहे.' साऊदी नंतर म्हणाला 'तो विकेटसमोर उभा होता.' यावर वॉर्नर म्हणाला, 'मित्रा तु एक चांगला माणूस होता.'

Southee gets aggressive at Burns

"You're supposed to be Mr Nice Guys!"Tim Southee has brought the aggression early on day one. Follow live: cricketa.us/AUSvNZ19-1

cricket.com.au ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 11, 2019

या सामन्यात रोरी 9 धावांवर बाद झाला. तर वॉर्नर 43 धावांवर बाद झाला. तसेच मार्नस लॅबुशानेने 143 धावा केल्या आणि ट्रेविस हेडने 56 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा केल्या आहेत. या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि नील वॅग्नरने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 5 बाद 109 धावा केल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top