Friday, 30 Oct, 12.44 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
Video: चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात पण, तरीही फलंदाजाने काढल्या दोन धावा, कशा ते पाहा

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. याचाच प्रत्यय युरोपियन क्रिकेट सिरिजच्या एका सामन्यादरम्यान आला. या स्पर्धेतील एका सामन्यात असे काही घडले की कोणाला विश्वासही बसणार नाही . यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू असतानाही फलंदाजांनी 2 धावा पळून काढल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

युरोपियन क्रिकेट सिरिजमधील पकसीलोना क्रिकेट क्लबच्या फलंदाजांनी काटालुन्या टायगर्स संघाविरुद्ध सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवले. पण हा सामना नाट्यमयरित्या बरोबरीत सुटला. झाले असे की शेवटच्या चेंडूवर पकसीलोना संघाला 3 धावांची गरज होती.

काटालुन्याच्या गोलंदाजाने शेवटचा चेंडू टाकला, त्यावर फलंदाजांला बॅटने फटका मारता आला नाही. पण चेंडू बाय गेल्याने फलंदाज धावा करण्यासाठी धावले. याचदरम्यान यष्टीरक्षकाने चेंडू पकडला आणि तो स्टंपजवळही पोहचला. पण त्याने तो चेंडू स्टंपला लावलाच नाही. तेवढ्यात स्ट्राईकवर आलेल्या फलंदाजांने दुसऱ्या धावेसाठी आवाज दिला आणि ते दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावेसाठी पळालेही.

यावेळी यष्टीरक्षकाने स्ट्रायकर एन्डच्या स्टंपला चेंडू न मारता नॉन स्ट्रायकर एन्डच्या दिशेला चेंडू फेकला. तो चेंडू गोलंदाजांने पकडला पण तो फलंदाजाला धावबाद करु शकला नाही. त्यामुळे पकसीलोनाच्या फलंदाजांनी सामना बरोबरीत राखला. पण नंतर सुपर ओव्हरमध्ये काटालुन्याच्या संघाला विजय मिळवण्यात यश आले.

पृथ्वी शॉ नाही तर आता 'हा' धुरंधर करणार ओपनिंग; प्लेऑफपुर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय

ICCने घातली होती 'या' खेळाडूवर २ वर्षांची बंदी, आता संघाने केलीय स्वागताची जय्यत तयारी

का चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीला मिळतो इतका सन्मान? माजी क्रिकेटरने सांगितले कारण

ट्रेडिंग लेख-

Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

SRH विरुद्ध केलेल्या 'या' तीन चुकांमुळे DC चं 'प्ले ऑफ' तिकीट लांबणीवर

हैदराबादचे 'हे' पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top