Friday, 20 Sep, 5.36 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये झाले हे मोठे बदल

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीधरन श्रीराम यांना फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

श्रीराम यांनी याआधी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून काम केले आहे. तसेच भारताकडून 8 वनडे सामने खेळलेले श्रीरामने ऑस्ट्रेलिया संघाचेही फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी ट्रेनर शंकर बासू यांची 2020 आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी स्ट्रेंथ अँन्ड कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बासू 2015 पासून 2019 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे ट्रेनर होते.

याव्यतिरिक्त आरसीबीच्या सपोर्ट स्टाफमध्ये ऍडम ग्रिफिथ यांची गोलंदाजी प्रशिक्षक, इव्हान स्पिचली यांची फिजिओ म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच मॅलोलन रंगरांजस यांची स्काउटिंग प्रमुख म्हणून आणि सौम्यादीप पायण यांची संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली आहे.

याबरोबरच याआधीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल 2020 साठी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना क्रिकेट कार्यकारी संचालक म्हणून तर ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सिमन कॅटिच यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

Related Posts

वाढदिवस विशेष: 'सिक्सर किंग' ख्रिस गेलबद्दल.

Sep 21, 2019

मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत २०००हुन अधिक स्पर्धक.

Sep 20, 2019

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top