Sunday, 09 Aug, 10.52 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
विराटच्या नेतृत्वात खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची उत्सुकता शिगेला; म्हणतो, भारतीय प्रेक्षकांना.

नवी दिल्ली। दीर्घ प्रतिक्षेनंतर आता १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन उशिरा केले जात आहे. बीसीसीआयने भारतात वाढत्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२०चे आयोजन परदेशात म्हणजेच यूएईत करण्याचा निर्णय घेतला आहे.

चाहत्यांसोबतच खेळाडूही आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान इतर खेळाडूंप्रमाणे ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचची उत्सुकताही अशीच वाढलेली पहायला मिळत आहे. फिंचने नुकतेच सांगितले की, तो आयपीएल २०२०मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत खेळण्यास उत्सुक आहे. फिंच या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात विराटच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.

विराटच्या नेतृत्वात खेळण्यासाठी फिंच उत्सुक

फिंचने एएनआयशी चर्चा करताना म्हटले, "विराटच्या नेतृत्वात खेळण्याची ही माझी पहिलीच संधी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी विराटविरुद्ध अनेक वर्षे खेळलो आहे. आयपीएल स्पर्धेत मला आशा आहे की माझा अनुभव कामी येईल आणि संघासाठी उपयुक्त ठरेल. मी विराट कोहलीचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न करेल."

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज फिंचचा विराटशी अनेकवेळा सामना झाला आहे. तरीही त्याचा असा विश्वास आहे की आयपीएलमध्ये सर्वकाही वेगळे असेल.

भारतीय चाहत्यांना मिस करतोय फिंच

फिंच पुढे म्हणाला की, यूएईत होणाऱ्या आयपीएलमध्ये भारतीय चाहत्यांना खूप मिस करणार आहे. तो म्हणाला, "मी एम चिन्नास्वामी स्टेडिअममधील चाहत्यांची लगबग मिस करेल. परंतु जर आपण चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये होम क्राऊडसमोर खेळत असू, तेव्हा ती गोष्टच वेगळी असते. परंतु यूएईमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करणेही माझ्यासाठी मोठी बाब आहे."

विराट कोहलीला आहे विजेतेपद जिंकण्याची प्रतिक्षा

आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे, तर अंतिम साामना १० नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. आरसीबी संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकाविले नाही. आरसीबीने आत्तापर्यंत २००९,२०११ आणि २०१६ असे तीन आयपीएल मोसमात अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. परंतु त्यांना तिन्हीवेळेस पराभवाचा सामना करावा लागला होता. कर्णधार कोहली या मोसमात आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याच्या प्रतिक्षेत आहे.

-वडील होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, तरीही 'हा' खेळाडू उतरला मैदानावर आणि बनला मॅच विनर

-पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही स्टोक्स; जाणून घ्या कारण.

-दुखापतग्रस्त नसूनही वेस्ट इंडिजचा 'हा' खेळाडू सीपीएलमधून बाहेर; कारण जाणून दंग व्हाल.

-ज्या संघासाठी आयपीएल खेळले त्याच संघाचे प्रशिक्षक बनले ५ खेळाडू

-आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना फ्लॉप झालेले ३ दिग्गज परदेशी खेळाडू

-वयाची चाळीशी ओलांडली तरी कसोटी क्रिकेट खेळणारे ४ भारतीय दिग्गज

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top