Saturday, 17 Aug, 3.20 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
या ५ निकषांच्या आधारावर शास्त्रींची झाली टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी फेरनिवड

काल(16 ऑगस्ट) बीसीसीआयच्या सल्लागार समीतीने वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. या सल्लागार समीतीमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश होता.

या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने शास्त्रींसह माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग या 6 जणांची अंतिम उमेदवार म्हणून निवड केली होती. पण सिमन्स यांनी मुलाखती आधीच माघार घेतली. त्यामुळे सल्लागार समीतीने अन्य पाच जणांच्याच मुलाखती घेतल्या.

या मुलाखतीनंतर शास्त्री, हेसन आणि मूडी यांची पहिल्या तीनमध्ये निवड झाली. पण अखेर या सर्वांमध्ये शास्त्री सरस ठरले. त्यामुळे आता पुढील दोन वर्षे शास्त्री भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कायम असणार आहेत.

शास्त्रींची निवड ही 5 निकषांवर करण्यात आली. ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यांना 5 निकषांवर गुण देण्यात आले. यामध्ये शास्त्रीं यांनी अन्य उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवत बाजी मारली.

प्रशिक्षक निवडण्यासाठी ज्या निकषांचा विचार करण्यात आला ते निकष म्हणजे- 1)प्रशिक्षकाचे तत्वज्ञान 2)प्रशिक्षक म्हणून अनुभव 3)प्रशिक्षक म्हणून मिळवलेले यश 4) संवाद कौशल्य 5)आधुनिक प्रशिक्षण साधनांचे ज्ञान.

या 5 निकषांवर शास्त्रींची प्रशिक्षकपदी फेरनिवड ही एकमताने केली असल्याचे कपिल देव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर प्रशिक्षकपदासाठी उमेदवारांनी दिलेल्या मुलाखतीबद्दल कपिल म्हणाले, 'आम्ही कोणाला किती गुण दिले याची चर्चा केली नाही. जेव्हा आम्ही ते सर्व गुण एकत्र केले तेव्हा उमेदवारांच्या गुणांमध्ये खूप कमी फरक होता.'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top