Saturday, 14 Dec, 2.13 pm महा स्पोर्ट्स

कब्बडी
यजमान रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व अदित्य शिंदे व श्रद्धा पवार कडे

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७ वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात आले आहे.

वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनला यजमान पद प्राप्त झाले आहे. याआधी १९७१,२००० व २००६ साली झालेल्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हाने यजमानपद भूषवले होते.

६७ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी यजमान रत्नागिरी जिल्हाने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. सह्याद्रीनगर मित्र मंडळ, साडवली, ता. संगमेश्वर, जी. रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पार पडली होती

पुरुष गटात अदित्य शिंदे, शुभम शिंदे, स्वप्नील शिंदे, अजिंक्य पवार, अभिषेक भोजणे, शेखर तटकरे आदी मत्ताबर खेळाडु संघात आहेत. महिला गटात श्रद्धा पवार, ललिता घरट, समरीन बुरोंडकर, तस्मिन बुरोंडकर, सिद्धी चाळके यादी अनुभवी खेळाडु संघात आहेत.

पुरुष संघाचे नेतृत्व अदित्य शिंदे कडे असणार आहे तर महिला संघाचे नेतृत्व श्रद्धा पवार कडे सोपवले आहे. पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी प्रशांत सुर्वे तर महिला संघाच्या प्रशिक्षकपदी समद बुरोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये पवन तलाव मैदान, इंदिरा गांधी स्टेडियम शेजारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा पुरुष संघ: अदित्य शशिकांत शिंदे (कर्णधार) शुभम शशिकांत शिंदे, शेखर तटकरे, स्वप्नील शिंदे, अजिंक्य अशोक पवार, अजिंक्य सुनील पवार, अभिषेक भोजने, रोहन गमरे, ओमकार पातेरे, रोहन उके, प्रतीक किर्वे, विवेक खाडेक.
प्रशिक्षक: श्री. प्रशांत सुर्वे
व्यवस्थापक: श्री. देवेंद्र पेंढारी

रत्नागिरी जिल्हा महिला संघ: श्रद्धा विनायक पवार (कर्णधार) ललित अरुण घरट, समरीन शौकत बुरोंडकर, तस्मिन समद बुरोंडकर, सिद्धी राजेंद्र चाळके, दिव्या दीपक सपकाळ, श्रद्धा पेंढारी, निकिता शांताराम वेले, सायली सुभाष कांबळे, मानसी मधुकर शिगवण, गौरी रवींद्र पवार, प्राप्ती विलास सुर्वे.
प्रशिक्षक: श्री. समद बुरोंडकर
व्यवस्थापीका: सौ. अरुणा कांगणे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top