Friday, 11 Jun, 5.52 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह आहे कोट्यावधी रुपयांचा मालक, कमाई पाहून व्हाल थक्क

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत मंडळान पैकी एक. अर्थातच त्या मंडळाकडून खेळणारे खेळाडूसुद्धा तितकेच श्रीमंत आहेत. हो, हे खरे आहे की भारतीय खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसुद्धा काही मागे नाही आहे.

हल्लीच बीसीसीआयद्वारे जाहीर केलेल्या खेळाडूंच्या वार्षिक करारामध्ये बुमराहने 'अ+' यादीत आपले स्थान पटकावले आहे. त्यामुळे बुमराहसुद्धा आता श्रीमंत खेळाडूंच्या यादीत आला आहे. चला तर मग जाणून घेऊया बुमराहची कमाई आणि त्याची लाइफस्टाइलबद्दल.

या गोष्टीत काहीच शंका नाही कि, आजच्या घडीला बुमराह हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. तिन्ही प्रकरच्या क्रिकेटमध्ये बुमराह चांगली कामगिरी करतो आहे. आयपीएलमध्ये सुद्धा बुमराह चागल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याची कामगिरी जसजशी शानदार होत आहे, तशी त्याची 'ब्रँड व्यालू' वाढत चालला आहे.

View this post on Instagram

एकमात्र भारतीय गोलंदाज आहे, ज्याने बीसीसीआयच्या वार्षिक करारात अ+चे स्थान मिळवले आणि तो म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याच्यासोबत फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा हे खेळाडू आहेत ज्यांना या करारातून वर्षाला ७ करोड रुपये मिळतात.

तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयामध्ये देखील बुमराहची कामगिरी नेहमीच जबरदस्त राहिली आहे. त्याला मुंबईच्या संघाने २०१८च्या 'मेगा ऑकशन' मध्ये पुन्हा आपल्या संघात घेतला. त्या वेळेस मुंबई संघाने त्याला १२ करोड रुपयांत संघात कायम केले होते.

View this post on Instagram

या व्यतिरीक्त बुमराहच्या प्रसिद्धीमुळे त्याला आता आंतरराष्ट्रीय ब्रँडसुद्धा मिळत आहेत. कल्टस्पोर्ट, एस्ट्रोलो, बोट, ड्रीम इलेवन आणि एसिक्स बॅंक इत्यादी ब्रँडच्या जाहीराती सध्या तो करत आहे. या सर्व ब्रँडचे त्याला करोडे रुपये मिळतात.

जसप्रीत बुमराहदेखील अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे रेंज रोवर, मर्सिडीज बेंज आणि निसान या सारख्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच अहमदाबाद आणि मुंबईमध्ये बुमराहचे अलिशान घर आहेत. हल्लीच त्याने पुण्यालासुद्धा नवीन घर घेतले आहे. दरम्यान, या सर्व गोष्टी पाहिल्यास बुमराहची एका वर्षातील कमाई २९ करोड इतकी आहे.

View this post on Instagram

बुमराहने भारतीय संघासाठी आजवर १९ कसोटी सामने खेळले आहे आणि त्यात त्याने ८३ गडी बाद केले आहे, ६७ एकदिवसीय सामन्यात १०८ गडी बाद केले आणि ५० टी-२० सामन्यात ५९ गडी बाद केले आहे. जसप्रीत बुमराह आपल्या 'यॉर्कर' चेंडूसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला 'योर्केर किंग' सुद्धा बोलतात.

अरेरे! फ्लिंटॉफच्या 'त्या' वक्तव्याची शिक्षा मिळाली होती ब्रॉडला; युवराजने ठोकले होते सलग ६ षटकार

टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला ८ वर्षांत मिळाली नाही संघात जागा, आता खेळणार 'या' देशाकडून

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top