Saturday, 18 Sep, 7.48 pm महा अपडेट

होम
Business Plan : रतन टाटांची 'ही' कंपनी 1 लाखांच्या गुंतवणुकीवर देतेय व्यवसाय करण्याची मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

महाअपडेट टीम, 18 सप्टेंबर 2021 :- आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. पण त्यासाठी खूप पैसा लागतो. त्याचबरोबर बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज सहज उपलब्ध होत नाही. आज आम्ही तुम्हाला कमी किमतीच्या व्यवसायाची कल्पना सांगणार आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. रतन टाटा यांनी गुंतवलेली जेनेरिक आधार ही स्टार्टअप (Generic Aadhaar) कंपनी ही संधी देत ​​आहे. या कंपनीच्या फ्रेंचाइजीमधून तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया..

एक लाखात करा व्यवसाय सुरू :-
तुम्ही जेनेरिक आधाराची (Generic Aadhaar) फ्रेंचाइजी देखील घेऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये गुंतवावे लागतील. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कंपनी आपल्या भागधारकांना 40 % मार्जिन देते. कंपनी 1000 प्रकारचे औषधे देईल. ग्राहकांना ही औषधे कमी दरात उपलब्ध ही होतील..

फ्रेंचाइजी घेण्यासाठी काय कराल ?

जेनेरिक आधारच्या (Generic Aadhaar) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जे स्वतःचे मेडिकल स्टोअर चालवत आहेत त्यांना कंपनी फ्रेंचाइजी देते. किंवा तुमचे नवीन स्टोअर सुरू करायचे आहे त्यांना. ही कंपनी पुण्यातून सुरू झाली असून ती आता 18 राज्यांमधील 130 हून अधिक शहरांमध्ये आहे. रतन टाटा यांनी यात गुंतवणूक केली आहे.

अर्ज कसा कराल ?
जेनेरिक आधार फ्रेंचाइजी घेण्यासाठी, कंपनीच्या वेबसाइट https://genericaadhaar.com ला भेट द्यावी लागेल.
येथे तुम्हाला Business Opportunity या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर एक फॉर्म उघडेल.
आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि शहराचे नाव इत्यादी भरून सबमिट करा.
आता कंपनी तुमच्या तपशीलांची पडताळणी केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी तुमच्याशी संपर्क साधेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Update
Top