Friday, 13 Dec, 2.43 pm महा अपडेट

क्रीडा
T20 मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्याच धाव संख्येवर

मुंबई : भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासाठी यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी-२० साठी फलदायी ठरले. विशेष म्हणजे क्रिकेटच्या तिसऱ्या प्रकारातील दोघांची धावसंख्या समान झाली आहे.
भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये बुधवारी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेलेला सामना भारताचा २०१९ मधील ट्वेण्टी-२० चा अखेरचा सामना होता. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहली रोहित शर्मापेक्षा एका धावेने आघाडीवर होता.

बुधवारच्या सामन्यात रोहित शर्माने ७१ धावा केल्या, तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७० धावा केल्या यामुळे दोघांची धावसंख्या प्रत्येकी २६३३ धावा अशी झाली. विराट कोहलीने या धावा ७० डावांतून, तर रोहित शर्माला त्यासाठी ९६ डाव लागले.

भारताच्या कर्णधाराने चोवीस अर्धशतके, तर रोहित शर्माने १९ अर्धशतके आणि ४ शतके झळकावली आहेत. बुधवारच्या सामन्यात रोहित शर्माने पाच षटकार ठोकून ट्वेण्टी-२० मध्ये ४०० षटकार ठोकण्याचा मान मिळवला. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Update
Top