कोलकता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. भवानीपूर ही जागा जरी एक प्रमुख केंद्रबिंदू ठरली असली, तरी झाडग्राम ही जागाही सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मतदारसंघात एका दुकानात झालमुरी भेळचा आस्वाद घेतला होता. आणि ही घटना त्यानंतर चर्चेचा एक मोठा विषय बनली होती. झाडग्राम जागेवर सध्या भाजप आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालमधील झाडग्राम विधानसभा मतदारसंघातील पहिल्या कलांनूसार आकडेवारी समोर आली आहे. 2021 च्या निवडणुकीत झाडग्राम विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे बिरबहा हान्सदा विजयी झाले होते. परंतु आता या जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे. सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम बंगालमधून येत आहेत. एकूण 293 जागांपैकी 245 जागांचे कल हाती आले असून भाजपने 157 जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) 115 जागांवर खाली घसरली आहे.
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
निकालाची वैशिष्ट्ये…
भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल
भाजप इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याची चिन्हं
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: पिछाडीवर
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचीही पिछेहाट
भाजप नेते सुवेंदू अधिकारींच्या नेतृत्त्वात भाजप आघाडीवर
मोदींनी जिथे झालमुडी खाल्ली, तिथे भाजप उमेदवार आघाडीवर
बंगालमध्ये मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास…
बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे. बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत. तर आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. आसाममध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असली तरी सगळ्या सर्व्हेमध्ये भाजपचे हिमंता बिस्वा सरमा हे पुन्हा सत्तेत येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

