Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे भाजपच्या महापौरांचा टोकाचा निर्णय.

सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे भाजपच्या महापौरांचा टोकाचा निर्णय.

सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे भाजपच्या महापौरांचा टोकाचा निर्णय…

धुळे : धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्या विषयी गोरक्षक असलेल्या संजय शर्मा यांनी सोशल मिडीयावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर संजय शर्मा यांचा निषेध तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने धुळे शहरातून मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चा वेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सातत्याने त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या महापौरांनी विष प्राशन केले आहे.

महापौर मायादेवी परदेशी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आमदार अनुप अग्रवाल यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या संदर्भात डॉक्टरांकडून माहिती घेतली असता, त्यांनी महापौरांनी गोळ्यांचा ओव्हर डोस घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील काही डोस हा त्यांच्या पोटात गेल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांची प्रकृती बिघडण्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या महापौर मायादेवी परदेशी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अनुप अग्रवाल यांनी केल्यानंतर संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, महापौरांनी विष प्राशन केल्याची बातमी ही अफवा असू शकते धुळे शहरात विविध उद्योग येत असून त्यातून जिल्ह्याचा विकास होणार आहे. जिल्ह्यात कोणतीही उद्योग येऊ नये यासाठी नकारात्मक वातावरण तयार करण्याचे हे षडयंत्र असून शहराच्या प्रथम नागरिकांविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

धुळे शहरातील गोरक्षक म्हणून ओळख असलेल्या संजय शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपासून आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह महापौर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर कत्तलखान्यांच्या विषयावरून समाज माध्यमांवर चांगलीच टीकेची झोड उठवली होती संजय शर्मा यांच्या समाज माध्यमांवरच्या पोस्टला भाजप कार्यकर्त्यांकडून देखील जशास तसे उत्तर दिले जात होते . समाज माध्यमांवरचा सुरू असलेला हा वाद अधिक टोकाला गेल्याने महापौर मायादेवी परदेशी यांनी थेट उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले. 19 नोव्हेंबर रोजी महापौर मायादेवी परदेशी यांनी अवैध धंदे तसेच कत्तलखाने यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसह समाज माध्यमांवर बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या संजय शर्मा यांचे विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

मात्र, पोलीस प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर महापौरांचे आंदोलन अवघ्या काही वेळातच स्थगित करण्यात आले यानंतर भाजपकडून गोरक्षक संजय शर्मा यांच्यावर 20 नोव्हेंबर रोजी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले ॲट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय शर्मा यांना अटक होण्यापूर्वी त्यांनी महापौर मायादेवी परदेशी यांच्या विषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता . याच वादातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय शर्मांविरोधात अॅट्रोसिटीसारख्या गुन्ह्यांची नोंद केली. गुन्ह्याची माहिती मिळताच संजय शर्मांनी सोशल माध्यमांत थेट महापौर मायादेवी परदेशींबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. गोरक्षक संजय शर्मा यांनी केलेल्या पोस्टमुळे मानसिक तणावातून मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन केल्याचा आरोप आमदार अनुप अग्रवाल यांनी केला. दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी संजय शर्मा विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे धुळ्यातील राजकारण तापले आहे.

याप्रकरणी 21 नोव्हेंबरला महापौर मायादेवी परदेशी यांच्या मुलासह जवळपास वीस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या सगळ्या प्रकारातून अस्वस्थ झालेल्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आपल्या घरातील काही गोळ्यांचे डोस घेण्याचा प्रयत्न केला त्यातील काही डोस त्यांच्या पोटात गेल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

मायादेवी परदेशी यांनी औषधांच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची प्रकृती बिघडली अशी माहिती डॉक्टरांनी दिली. महापौर मायादेवी परदेशी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून गोरक्षक संजय शर्मा आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अवैध कत्तलाखान्यावरुन चांगलीच जुंपली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mahabharat News