पुणे | केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (MHADA) आज, गुरुवारी (२८ मे २०२६) होणारी सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाने या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे.
यापूर्वी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) क्षेत्रातील विविध सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये '२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना' आणि '१५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजने'अंतर्गत विक्रीअभावी रिक्त असलेल्या घरांचा समावेश होता.
IPL 2026: रियान पराग विरुद्ध शुभमन गिल! 'क्वालिफायर २' चा सामना कधी अन् कुठे? जाणून घ्या..
निवडणूक आचारसंहितेमुळे आजची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असली, तरी नागरिकांना लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे. या सर्व रिक्त सदनिकांच्या वितरणासाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (First Come First Served) या तत्त्वावर सोडतीचा नवीन आणि सुधारित कार्यक्रम लवकरच घोषित करण्यात येईल, असे म्हाडाच्या पुणे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर या प्रक्रियेला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे.

