Asian Games 2026 | जपानमधील आयाची-नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games) क्रिकेट स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही गटांत भारतीय संघ 'गतविजेता' म्हणून मैदानात उतरणार आहे.
सर्व सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार असून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा (Full International Status) असणार आहे. हे सर्व सामने आयाची प्रांतातील कोरोगी ॲथलेटिक पार्क येथे पार पडतील.
महिला स्पर्धा: १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६
पुरुष स्पर्धा: २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६
आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची ही चौथी वेळ आहे (यापूर्वी २०१० ग्वांगझू, २०१४ इंचॉन आणि २०२३ हांगझोऊ येथे क्रिकेट खेळवले गेले होते).
पुरुषांच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या आशियातील चार प्रमुख संघांना थेट सीडिंग देण्यात आले असून, त्यांचा थेट उपांत्यपूर्व (Quarter-Final) फेरीत प्रवेश झाला आहे.
उर्वरित चार जागांसाठी प्राथमिक फेरी खेळवली जाईल:
अ गट: अफगाणिस्तान, जपान, नेपाळ
ब गट: हाँगकाँग चीन, मलेशिया, ओमान
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. या वेळापत्रकामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धेत जास्तीत जास्त एकच सामना (उपांत्य किंवा अंतिम फेरीत) होण्याची शक्यता आहे.
पीसीयूचे उपक्रम सक्षम नागरिक घडविण्यासाठी उपयोगी - कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे
महिला गटातही भारताला थेट सीडिंग मिळाले आहे. गतविजेता भारतीय महिला संघ आपल्या मोहिमेची सुरुवात यजमान जपानविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत करेल.
उपांत्यपूर्व फेरीची रचना:
भारत वि. जपान
बांगलादेश वि. चीन
श्रीलंका वि. मलेशिया
पाकिस्तान वि. थायलंड
भारत-जपान सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत बांगलादेश किंवा चीनशी भिडणार आहे.
पुरुष संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, रवी बिश्नोई, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी.
महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक), भारती फुलमाळी, श्री चरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गायकवाड, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, राधा यादव आणि नंदिनी शर्मा.

