Dailyhunt
अजिंक्य माचुत्रे याला ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कांस्यपदक

अजिंक्य माचुत्रे याला ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कांस्यपदक

MahaeNews 1 week ago

पिंपरी-चिंचवड : देवळी, जि. वर्धा येथे दिनांक ३१ एप्रिल व १ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या दुसऱ्या ग्रिकोरोमन वरिष्ठ गट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या अजिंक्य माचुत्रे याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेतील पहिल्या फेरीत अजिंक्यने धाराशिवच्या प्रतिस्पर्ध्यावर ८-० असा एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत पुणे शहरच्या मल्लाविरुद्ध चितपट करत विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीत पुणे जिल्ह्याच्या खेळाडूविरुद्ध ४-५ गुणांनी पराभव झाला. मात्र रिपेच फेरीत अजिंक्यने दमदार पुनरागमन करत कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत जळगाव जिल्ह्याच्या मल्लावर ८-० असा दणदणीत विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

अजिंक्यच्या या यशाबद्दल पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, कार्याध्यक्ष विशाल कलाटे, भारत केसरी विजय गावडे, सरचिटणीस संतोष माचुत्रे तसेच इतर पदाधिकारी व कुस्तीप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले.

अजिंक्य सध्या रहाटणी येथील काळभैरवनाथ तालीममध्ये पैलवान किशोर नखाते आणि अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews