Dailyhunt
भोसरीतील दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी

भोसरीतील दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी

MahaeNews 1 week ago

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) भोसरीतील श्री टागोर शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यामंदिराने घवघवीत यश संपादन केले आहे.

शाळेतील श्रेया योगेश कलशेट्टी आणि रेणुका घुले या दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय गुणवत्ता यादीत निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.​

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ डिसेंबर २०२५ रोजी ही परीक्षा घेतली होती. नुकतीच या परीक्षेची अंतिम निवड यादी आणि गुण यादी जाहीर करण्यात आली. २४ फेब्रुवारीला प्राथमिक गुणतालिका जाहीर झाल्यानंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्यांचा विचार करून परिषदेने ही अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये इंद्रायणीनगर येथील या दोन्ही विद्यार्थिनींनी आपले नाव कोरले आहे.​

या यशस्वी विद्यार्थिनींना मार्गदर्शक शिक्षक श्री. बनसुडे सुखदेव उद्धव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल श्री टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार विठोबा लांडे आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. उद्धव विठ्ठल ढोले यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कठीण परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews