Saturday, 23 Jan, 3.16 pm MahaeNews

आंतरराष्ट्रीय
बोलो बजरंग बली की जय! हनुमानांचा फोटो शेअर करून ब्राझीलच्या पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार

नवी दिल्ली -जानेवारी २०२० पासून कोरोनाचा प्रसार वेगाने जगभर होऊ लागला. कालांतराने या विषाणूने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतलं आणि जवळपास ६ ते ७ महिनेय अख्खं जग ठप्प केलं होतं. मात्र, आता हळूहळू सर्व नियम शिथिल होत असतानाच कोरोनावर प्रतिबंध करणारी लसही निर्माण झाली आहे. अनेक देशात लसीकरणाला सुरुवातही झआली आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता. भारतानेही ब्राझीलला लस पुरवठा करण्यास परवानगी दिल्यानंतर राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना भारतात परवानगी देण्यात आली आहे. सध्या आपत्कालीन वापरासाठी लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ब्राझीलनंही लसीची मागणी केली होती. ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी तसं पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं. ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला भारतानं सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवण्यास सुरूवात केली. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत आभार मानले.

'जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार,' असं म्हणत बोलसोनारो यांनी म्हटलं आहे.

बोलसोनरो यांच्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिसाद दिला आहे. 'बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं,' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews
Top