Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चऱ्होलीत पत्नीला अमानुष मारहाण

चऱ्होलीत पत्नीला अमानुष मारहाण

MahaeNews 2 weeks ago

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

ऱ्होली परिसरात कौटुंबिक हिंसाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पत्नीने आर्थिक फसवणुकीचा जाब विचारताच पतीने तिच्यावर अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती किरण सुरेश पानसरे याच्याविरोधात दिघी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण पानसरे हा चऱ्होली येथील आस्था डेव्हलपर्सच्या इमारतीतील फ्लॅट क्रमांक ३०८ मध्ये वास्तव्यास आहे. त्याने पत्नीचा विश्वास संपादन करून विविध कारणे सांगत तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, या आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याची कुणकुण लागताच पत्नीने याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले असून, संतापाच्या भरात आरोपी पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

घटनेनंतर पीडित महिलेने रुग्णालयातूनच दिघी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधात आर्थिक फसवणूक, कौटुंबिक हिंसाचार आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

परिसरात संताप कडक कारवाईची मागणी

या घटनेमुळे चऱ्होली व दिघी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पत्नीवर झालेला हा अमानुष अत्याचार निषेधार्ह असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित महिलेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व महिला संघटनांकडून होत आहे. दिघी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews