Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्काराने महादेव नलावडे यांचा सन्मान

छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्काराने महादेव नलावडे यांचा सन्मान

MahaeNews 1 week ago

मुंबई | प्रतिनिधी

राष्ट्र विकास, समाजसेवा आणि शिवकार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल महादेव कृष्णा नलावडे (मराठा सेवक) यांना 'छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार २०२६' प्रदान करून गौरविण्यात आले.

स्वराज्य प्रतिष्ठान (रजि.) व सुतामा बाबू गेणू स्मारक समिती (नियोजित) यांच्या संयुक्त विद्यमाने, शिवराज्याभिषेक गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते श्री. नलावडे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेची कामे विहित मुदतीत पूर्ण करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

समाजहित, राष्ट्र विकास आणि शिवकार्याची प्रेरणा जपणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये श्री. महादेव नलावडे यांनी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक, शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. नलावडे यांनी हा सन्मान समाजसेवेची जबाबदारी अधिक वाढविणारा असून, भविष्यातही समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहित, राष्ट्रहित आणि मराठा समाजाच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार २०२६' हा माझ्यासाठी सन्मान नसून समाजसेवेची जबाबदारी अधिक वाढविणारा आहे. भविष्यातही समाजाच्या उन्नतीसाठी निष्ठेने कार्य करत राहीन.

- महादेव कृष्णा नलावडे (मराठा सेवक)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews