Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देवा विठ्ठला' भक्तिगीतातून विठ्ठलभक्तीचा सुरेल आविष्कार!

देवा विठ्ठला' भक्तिगीतातून विठ्ठलभक्तीचा सुरेल आविष्कार!

MahaeNews 3 days ago

पुणे : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणाला साजेसा, श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या चरणी समर्पित 'देवा विठ्ठला' हा भावस्पर्शी भक्तिगीत नुकताच प्रदर्शित झाला असून, वारकरी संप्रदायातील भक्ती, पंढरीच्या दर्शनाची ओढ आणि विठ्ठलनामाचा गजर यांचे हृदयस्पर्शी चित्रण या गीतातून करण्यात आले आहे.

या भक्तिगीताचे विशेष आकर्षण म्हणजे संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे यांनी दिलेले सुरेल, पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधणारे संगीत. टाळ-मृदुंगाच्या नादासह भक्तीभाव अधिक खुलवणाऱ्या संगीत संयोजनामुळे हे गीत प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला स्पर्श करते. संगीत संयोजन, कीबोर्ड आणि गिटारची जबाबदारीही श्रेयस देशपांडे यांनी सांभाळली आहे.

गीताला आपल्या मधुर, भावपूर्ण आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या आवाजाने जीवनदान देणाऱ्या गायिका सावनी रविंद्र यांच्या गायकीने 'देवा विठ्ठला' अधिक प्रभावी बनले आहे. त्यांच्या सुरेल सादरीकरणामुळे गीतातील प्रत्येक शब्द श्रोत्यांच्या मनात थेट पोहोचतो.

या गीताचे शब्द डॉ. प्रचिती गोरे-भागवत यांनी लिहिले असून, विठ्ठलभक्तीतील आर्तता, प्रेम आणि समर्पण यांचा सुंदर आविष्कार त्यांनी गीतातून मांडला आहे. सुचेता गोसावी, मानली राज्याध्यक्ष आणि कांचन साळुंखे यांनी कोरस गायन केले आहे.

ध्वनिमुद्रण श्रेयस रेकॉर्ड्स स्टुडिओ आणि टिंब्रेवर्ल्ड स्टुडिओ येथे झाले असून, तुषार पंडित आणि आयुष अडंगळे यांनी रेकॉर्डिंगची जबाबदारी सांभाळली. गीताचे मिक्सिंग आणि मास्टरिंग आयुष अडंगळे यांनी केले आहे.

या गीताचा व्हिडिओ शुभ्रांशू डोंगावणकर (EightMedia) यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला असून, संपादन उदय बोईनवाड, तर ग्राफिक्स रोशन इंगळे आणि शुभ्रांशू डोंगावणकर यांनी केले आहेत. पंढरपूर व वारकरी परंपरेचे मनोहारी दृश्य टिपण्यासाठी उन्मेष कोर्डे, मंगेश ढोले, EightMedia, कृष्णा वाजगे, ओम लोकारे, ओम सरडे आणि स्वप्नील बारगे यांचे विशेष योगदान लाभले आहे.

EightMedia यांनी या प्रकल्पासाठी डिजिटल मार्केटिंग पार्टनर म्हणून काम पाहिले असून, डॉ. सुशांत पाटील ग्रुप आणि अॅड. अनुजा सुशांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 'Presented by Shreyas Records' या बॅनरखाली प्रदर्शित झालेले 'देवा विठ्ठला' हे भक्तिगीत वारकरी संप्रदायाची परंपरा, विठ्ठलभक्तीची ओढ आणि अध्यात्मिक भावविश्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक सुंदर प्रयत्न ठरत असून, संगीतप्रेमी आणि विठ्ठलभक्तांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews